शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी इरईचे संवर्धन करा हो, नागरिकांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

इरई नदीवरील धरणामुळे चंद्रपूरच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र, या नदीच्या खोलीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या संवर्धनासाठी इरई बचाव जनआंदोलनाने अनेकवेळा प्रशासनाला पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.  दरवर्षी नागरिकांना पुराचा धोका होत आहे. यामध्ये अनेकवेळा वित्तहानी झाली आहे. मात्र, प्रशासन, शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे इरईची दिवसेंंदिवस दुरवस्था होत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूरची जीवनदायिनी म्हणून इरईची ओळख आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नदीपात्रात झुडपे तसेच पात्र उथळ झाले आहे. या नदीचे खोलीकरण करून बंधारे बांधण्याची मागणी केली जात आहे. मात्र, शासन तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने इरई बचाव जनआंदोलनाने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राज्य शासनाला दिला आहे.इरई नदीवरील धरणामुळे चंद्रपूरच्या नागरिकांची तहान भागविली जात आहे. मात्र, या नदीच्या खोलीकरणाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या नदीच्या संवर्धनासाठी इरई बचाव जनआंदोलनाने अनेकवेळा प्रशासनाला पुराच्या संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.  दरवर्षी नागरिकांना पुराचा धोका होत आहे. यामध्ये अनेकवेळा वित्तहानी झाली आहे. मात्र, प्रशासन, शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे इरईची दिवसेंंदिवस दुरवस्था होत आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने खोलीकरणाचे काम हाती घेतले होते. मात्र, निधी संपल्याचे कारण देत काम थांबविले होते. ते कामही आजपर्यंत सुरूच झाले नसल्याने नदीचा आता नाला झाला आहे. त्यामुळे इरईचे खोलीकरण करून नदी पात्रामध्ये बंधारे बांधावे, अशी मागणीचे इरई (नदी) बचाव जनआंदोलनाने राज्य शासनाला निवेदन पाठविले आहे. काम सुरू न केल्यास २२ मार्च जलसंपदा दिवसापासून  नदी पात्रात जलसत्याग्रह तसेच २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीपासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशाराही निवेदन देण्यात आल्याची माहिती इरई बचाव जनआंदोलनचे कुशाब कायरकर, पांडुरंग गावतुरे, अरविंद खोब्रागडे, संगीता विधाते, गीता अत्रे, संतीता देवतळे, माया गावतुरे  यांच्यासह नागरिकांनी  दिली.

अतिक्रमणही वाढले- इरई नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. अनेकांनी तर अगदी पात्रातच बांधकाम केले आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे  आहे.

 

टॅग्स :riverनदी