शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

उपकेंद्रातच मिळणार आता १२ आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:55 IST

गावात नाममात्र आरोग्य सेवा असल्यामुळे रुग्ण थेट शहराकडे धाव घेतात. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची गर्दी होत असल्यामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची सेवाही तोकडी पडत आहे.

ठळक मुद्दे७५ उपकेंद्रांची निवड : जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाचा ताण कमी होणार

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गावात नाममात्र आरोग्य सेवा असल्यामुळे रुग्ण थेट शहराकडे धाव घेतात. परिणामी क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची गर्दी होत असल्यामुळे जिल्हा व ग्रामीण रुग्णालयाची सेवाही तोकडी पडत आहे. यामुळे योग्य उपचार मिळत नसल्यामुळे येथील यंत्रणेला रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आता आयुष्यमान भारत अंतर्गत आरोग्य उपकेंद्रांचे रुपांतर हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये करण्यात येत आहे. या ठिकाणी तब्बल १२ आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णांना गावातच मिळणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ३३९ पैकी ७५ आरोग्य उपकेंद्रांचे रुपांतर हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये कायमस्वरुपी वेद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या सेंटरसाठी ३७ वैद्यकीय अधिकाºयांची भरती होऊन रूजू झालेले आहे. त्यांचे चंद्रपूर प्रशिक्षणही सुरू आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर हे वैद्यकीय अधिकारी संबंधित हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये रूजू होणार आहे. त्यांच्या सोबतीला स्टाफ नर्स व चार आरोग्यसेविका असणार आहे. ही मंडळी ज्या सेंटरमध्ये रूजू होईल. त्या हद्दीत येणाºया नागरिकांना १२ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी आपल्या सेंटरच्या क्षेत्रातील सर्व कुटुंबांची आरोग्य विषयक माहिती आॅनलाईन पद्धतीने संग्रही करणार आहे. यानंतर त्या कुटुंबातील एखादा रुग्ण उपचारासाठी आल्यास जिल्हा वा ग्रामीण रुग्णालयाच्या तज्झ वैद्यकीय अधिकाºयांमार्फत सल्ला घेऊन गावातच त्या रुग्णावर आवश्यक तो उपचार केला जाणार आहे. यामुळे रुग्णांना जिल्हा वा ग्रामीण रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. आणि या रुग्णालयांचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.या आरोग्य सेवा मिळणारआरोग्य उपकेंद्राचे हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये रुपांतर झालेल्या उपकेंद्रात खालील १२ आरोग्य सेवा मिळणार आहे. यामध्ये माता व बाल आरोग्य, असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम अंमलबजावणी, मधुमेह, रक्तदाब, उच्चरक्तदाब, कर्करोग, पक्षाघात, आयुष पारंपरिक पद्धती अंमलबजावणी, असहाय्य रुग्णांची काळजी, किशोरवयीन मुला-मुलींची आरोग्य तपासणी, साथरोग नियंत्रण कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व अन्य आरोग्य सेवांचा समावेश आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील ७५ आरोग्य उपकेंद्रांचे हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटरमध्ये रुपांतर झाले आहे. पंचायत समिती स्तरावर वैद्यकीय अधिकाºयांची भरती घेण्यात आली. यामध्ये ३७ डॉक्टर्स रुजू झाले आहे. त्यांचे प्रशिक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिक विद्यापीठ मान्यता प्राप्त मध्यसेवा प्रदाता प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे. प्रशिक्षण संपताच हे वैद्यकीय अधिकारी संबंधित उपकेंद्रात रूजू होणार आहे. यानंतर तेथेच १२ सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक. चंद्रपूर.