शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘नथिंग टू से’ आठ पारितोषिकासह प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:50 IST

५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील घवघवीत यशानंतर नवोदिता संस्था चंद्रपूरच्या चमूने ६६ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत ‘नथिंग टू से’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह इतर आठ पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली आहे.

ठळक मुद्देअंतिम फेरीत दाखल : राज्य नाट्य स्पर्धेची नागपूर विभागीय प्राथमिक फेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील घवघवीत यशानंतर नवोदिता संस्था चंद्रपूरच्या चमूने ६६ व्या कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीत ‘नथिंग टू से’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह इतर आठ पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली आहे.२९ डिसेंबर रोजी रघुजी नगर नागपूर येथे कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवनात पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात कामगार कल्याण केंद्र ललित कला भवन चंद्रपूर अर्थात नवोदिताच्या चमुने मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके स्वीकारली.प्रसाद दाणी लिखित ‘नथिंग टू से’ या नाटकाला सांघिक प्रथम, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम डॉ. जयश्री कापसे गावंडे, सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय प्रथम बकुळ धवने, सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय द्वितीय जयंत वंजारी, पुरुष अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र राजेंद्र तुपे, सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम पंकज नवघरे, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना द्वितीय हेमंत गुहे, सर्वोत्कृष्ट संगीत नियोजन द्वितीय अंकूश राजूरकर अशी एकूण आठ पारितोषिके प्राप्त झाली आहेत.याआधी या नाटकाने ५८ व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत निर्मितीच्या प्रथम पुरस्कारासह आठ पारितोषिके पटकावत अंतिम फेरी गाठली होतीे. आता कामगार राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरीसुद्धा गाठली आहे. विशेष म्हणजे, ‘नथिंग टू से’ या नाटकाची कथाही सुरेख असून सादरीकरणादरम्यान रसिकांना आपल्या जागेवर खिळवून ठेवण्यात कलावंत यशस्वी झाले होते.बकूळ धवनेची हॅट्रीकया नाटकातील प्रमुख कलावंत बकूळ धवने हिला कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय फेरीत सलग तीन वर्षे स्त्री अभिनयाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून तिने हॅट्रिक साधली आहे. या नाटकाचे निर्माते अजय धवने, प्रशांत कक्कड असून सहनिर्माते आशिष अंबाडे आणि नूतन धवने हे आहेत. ‘नथिंग टू से’ या नाटकाच्या संपूर्ण टीमने अत्यंत ताकदीने आपल्या कलागुणांना स्पर्धेत प्रदर्शित केले होते.