जे घडले ते फार दुर्दैवी आहे. आमटे कुटुंबीयांना यातून सावरायला वेळ लागेल. शीतल अतिशय बुद्धिमान व गुणवत्तादायी होती. तिने जे काही स्वप्न पाहिले. तिची पुढील दिशा जी काही होती. ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबद्ध आहेत. डाॅ. शीतलच्या मृत्युची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सत्य पुढे येईलच. डाॅ. शीतलच्या मृत्युने आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरायला वेळ लागेल. आजवर समाजाने आनंदवनला जे सहकार्य केले. तसेच सहकार्य यापुढेही मिळतील. आमटे व करजगी परिवार दु:खात आहे. करजगी परिवाराने आपल्या पद्धतीने आपले दु:ख व्यक्त केले आहे. आनंदवनबाबत निर्णय करण्याची ही वेळ नाही. विचारांची दिशा योग्य पद्धतीने जाण्यासाठी यातून सावरण्यासाठी काही वेळ लागणार आहे. काळ योग्य पद्धतीने उत्तर देईल.
-पल्लवी आमटे