शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतातील ‘नवरंग’ नागभीडच्या शिवटेकडीवर

By admin | Updated: August 30, 2014 23:33 IST

उत्तर आणि उत्तर पूर्व भारत प्रदेशात वास्तव्यास असणारा ‘नवरंग’ हा पक्षी सद्यास्थितीत नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वास्तव्यास आला आहे. सध्याचा काळ या नवरंग

घनश्याम नवघडे - नागभीडउत्तर आणि उत्तर पूर्व भारत प्रदेशात वास्तव्यास असणारा ‘नवरंग’ हा पक्षी सद्यास्थितीत नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वास्तव्यास आला आहे. सध्याचा काळ या नवरंग पक्षाचा प्रजोत्पादनाचा काळ मानला जातो. मराठीत या पक्षाचे नाव नवरंग असे असून इंग्रजीत याला ’ल्ल्िरंल्ल ढ्र३३ं असे म्हणतात. शास्त्रीय भाषेत याचे नाव ढ्र३३ं इ१ंूँ८४१ं असे आहे. हा पक्षी मुख्यत्वे उत्तर पूर्व भारत व उत्तर भारतात वास्तव्यास असतो. हा पक्षी उन्हाळ्याच्या शेवटी मध्य भारत, कोकण व मलबार या ठिकाणी स्थानांतरण करुन घरटी बांधण्याचे काम कतो. नागभीड तालुक्यातील घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात हा पक्षी वास्तव्यास आला आहे. हा पक्षी आपले घरटे झाडावर जमिनीपासून पाच मिटर उंचीवर बांधतो. घरटी बांधण्यासाठी गवत, पाने, दोरा, पिसे तसेच माती या साधनांचा वापर करतो. मादी चार ते सहा अंडी देते. अंडी उबवण्यास १५ ते १६ दिवसांचा अवधी लागतो. सध्या अंडी उबवण्याचा अवधी संपला असून, या पक्षाची पिले १० ते १२ दिवसांची झाली आहेत, अशी माहिती येथील पक्षी अभ्यासक सतीश चारथळ आणि प्रशांत वालदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.या पक्षाचा आकार आपल्याकडे दिसणाऱ्या ‘मैना’ या पक्षापेक्षा थोडा लहान आहे. पंखाचा रंग हिरवट व त्यावर निळ्या रंगाचा पट्टा असतो. डोळ्यावर काळ्या रंगाची पट्टी व गळ्याच्या भाग पांढऱ्या रंगाचा असतो. छाती पिंगट रंगाची असून पोटापासून तर शेपटीखालील भाग गदड लाल रंगाचा असतो. त्यामुळेच या पक्षाची सहज ओळख पटते. नर-मादी दिसायला सारखेच असतात. उन्हाळ्याच्या शेवटच्या काळखंंडात येथे वास्तव्यास आलेला हा पक्षी प्रजोत्पादनानंतर हिवाळ्याच्या सुरुवातीला परत आपल्या मुक्कामी निघून जातात. सध्या या पक्षाचा घोडाझरी आणि शिवटेकडी परिसरात वावर दिसून येत असल्याने पक्षीप्रेमींत या पक्षाविषयी उत्सुकता वाढली आहे.(वार्ताहर)