शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नॉनमॅट्रीकला लाभ, मॅट्रीकवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 01:15 IST

राज्यात १९७२ पूर्वी मॅट्रीक (प्रशिक्षित) व नॉनमॅट्रीक(अप्रशिक्षित) असलेल्या युवकांची ‘डीम्ड ट्रेन्ड’ शिक्षक म्हणून नियुक्त केली जात होती.

चंद्रपूर : राज्यात १९७२ पूर्वी मॅट्रीक (प्रशिक्षित) व नॉनमॅट्रीक(अप्रशिक्षित) असलेल्या युवकांची ‘डीम्ड ट्रेन्ड’ शिक्षक म्हणून नियुक्त केली जात होती. त्यातील बहुतेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. या निवृत्त शिक्षकांमधील नॉन मॅट्रीक शिक्षकांना सहावा व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या; मात्र मॅट्रीक असलेल्या शिक्षकांना त्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.राज्यात १९७२ पूर्वी शासकीय आदेशानुसार जिल्हा परिषद, नगर पालिका, नगरपरिषद, नगरपालिका शिक्षण मंडळ, महानगर पालिका शिक्षण मंडळ, मान्यता प्राप्त खासगी प्राथमिक शाळा यामध्ये नियुक्त केलेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना ‘डीम्ड ट्रेन्ड’ शिक्षक समजण्यात आले आहे. सध्या पदवीधर आणि पदवीधर नसलेले प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांवर नियुक्त केले जातात. या शिक्षकांमध्ये पदवीधरांना वेतनश्रेणी व इतर भत्ते पदवीधर नसलेल्या शिक्षकांपेक्षा वाढीव दिले जातात. सेवानिवृत्तीनंतरचे लाभदेखील पदवीधर व पदवीधर नसलेल्या शिक्षकांच्या वेगवेगळे दिले जातात. त्याप्रमाणे पूर्वीच्या मॅट्रीक म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांना नॉन मॅट्रीक म्हणजे अप्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी व इतर लाभ देण्यात येत असत. नॉन मॅट्रीक (अप्रशिक्षित) ‘डीम्ड ट्रेन्ड’ प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारी १९८६ रोजीच्या आयोगानुसार ९७५ - १९६० व ११९६ च्या पाचवे वेतन आयोगानुसार ३२००-८५-४९०० ही वेतन श्रेणी लागू करून थकबाकीचा लाभ दिलेला आहे. परंतु मॅट्रीक असलेले (अप्रशिक्षित) ‘डीम्ड ट्रेन्ड’ प्राथमिक शिक्षकांना ११८६ च्या चौथा वेतन आयोगाप्रमाणे ९२००-२०४० व ११९६ च्या पाचवे वेतन आयोगाप्रमाणे ४५००- १२५- ७००० ही वेतन श्रेणी लागू न करता त्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात मॅट्रीक पास अप्रशिक्षित ‘डीम्ड ट्रेन्ड’ प्राथमिक शिक्षकांना चौथे व पाचवे वेतन आयोगाचा लाभ मिळाले नसल्यामुळे त्यांच्यात असंतोष आहे, असे चंद्रपूर तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या सचिव अंकम डोन्नय्या यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय ९ सप्टेंबर १९९९ अन्वये अधिसूचित यादी अ.क्र. ४३ अवलोकन करून मॅट्रीक (अप्रशिक्षित) ‘डीम्ड ट्रेन्ड’ प्राथमिक शिक्षकांना चौथा वेतन आयोगानुसार रु. १२००-२०४० व पाचवे वेतन आयोगानुसार ४५००- १२५- ७००० ही वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी डोन्नय्या यांनी केली आहे. (प्रतिनिधी)