शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा लाभ मनपा मालामाल

By admin | Updated: November 15, 2016 00:42 IST

यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिका थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी जंगजंग पछाडत होती.

चंद्रपूर : यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिका थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी जंगजंग पछाडत होती. दोन वर्षांत चंद्रपूरकरांकडे २६ कोटी रुपयांचा मालमत्ता थकीत झाला होता. मात्र, केंद्र सरकारने ५०० रुपये व हजाराच्या नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर बँकांच्या कटकटीचा सामना करण्यापेक्षा मनपाचा थकीत असलेला मालमत्ता कर भरण्यास नागरिकांनी प्राधान्य दिले. त्यामुळे गेल्या चार दिवसांत विक्रमी वसुली होऊन थकबाकीचे ३ कोटी ४ लाख रुपये मनपाच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या आठवड्यात ५०० रुपये व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. ही बंदी लागू झाल्यानंतर जुन्या नोटांचे काय करायचे, असा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला होता. बँकेतून जुन्या नोटा बदलून देण्यात येत होत्या. त्याकरिता नागरिकांनी एकच गर्दी केली. बँका उघडण्यापूर्वी नागरिकांनी रांगा लावल्या. सामान्य नागरिक, कर्मचारी, वृद्ध आदी सर्वच कामाला लागले आहे. कसेही करून जुन्या नोटा बदलण्यात यश मिळविले. एरवी रविवार हा नागरिकांसाठी सुटीचा दिवस असतो.पण हा रविवार नागरिकांसाठी नोटा बदलण्यात गेला. रविवारीदेखील बँक उघडण्यापूर्वीच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एटीएमपुढेही सकाळपासूनच रांगा लागल्या. गुरूनानक जयंती निमित्त शासकीय सुटी असल्याने सोमवारी बँका बंद होत्या. तेव्हा बँकांमध्ये नोटा बदलणे शक्य नव्हते. बँकातून जुन्या नोटा बदलण्याच्या पर्यायासह शासनाने थकीत कराचा भरणा जुन्या नोटांच्या माध्यमातून करण्याचे आवाहन केले होते. बँकांपुढे रांग लावण्याचा त्रास वाचविण्याकरिता नागरिकांना ही सुवर्ण संधी ठरली. त्यामुळे महावितरण कंपनी, मनपा, जलसंपदा विभाग आदींची थकबाकी चुकविण्यालाही प्राधान्य देण्यात आले. या विभागांनी १४ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीची रक्कम जुन्या नोटांमध्ये स्वीकारण्याची घोषणा केली आहे. १४ नोव्हेंबरला बँका बंद असल्याने अनेकांनी शासनाच्या थकीत कराचा भरणा केला.चंद्रपूर शहरातील नागरिकांनी गेल्या चार दिवसांमध्ये मनपाचे तीन कोटी १५ लाख रुपये मालमत्ता कराच्या रूपयाने भरले. मनपाची दोन वर्षांत तब्बल २६ कोटी रुपयांची थकबाकी झाली होती. त्यापैकी यापूर्वीच ५ कोटी ७५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली होती.त्यानंतर आता रविवारपर्यंत २ कोटी २५ लाख रुपये भरण्यात आले. शहरातील तीन झोनमध्ये ३ कोटी १५ लाख रुपयांची थकबाकीची रक्म्कम जमा झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा उर्वरित थकीत मालमत्ता करासाठी मनपाला अभियान राबवावे लागणा आहे. (प्रतिनिधी)महावितरणची एकाच दिवसात एक कोटीची वसुलीमनपाप्रमाणे थकीत वीज बिलाचा भरणा करण्यासाठी ग्राहकांना आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. गेल्या तीन दिवसांत वीज बिलाचे ३ कोटी ४३ लाख रुपये वसूल झाले होते. सोमवारी शेवटच्या दिवशी तब्बल एक कोटी रुपयांची वसुली झाली आहे. महावितरणला एकूण ४ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी मिळाली. चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली मंडळात ही वसुली करण्यात आली आहे. जलसंपदा विभागानेही थकीत पाणीपट्टीची वसुली केली आहे. नोटावरील बंदी शासकीय कार्यालयांना आपला महसूल वाढविण्याकरिता उपयुक्त ठरला आहे.मनपाची जुन्या दराने थकबाकी वसुलीमहानगरपालिकने थकीत मालमत्ता कराची वसुली जुन्या दराने केली आहे. मनपाने करवाढ केल्याने थकीत कर वाढून तो २६ कोटी रुपयांवर गेला होता. करवाढीचा निर्णय झाल्यावर नागरिकांनी कराचा भरणा थांबविला होता. त्यांनतर एक वर्षासाठी २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा दर लावण्यात आला. तर चालू वर्षाचा कर नवीन दराने घेण्यात आला. त्याबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार, ही थकबाकी वसूल करण्यात आली.