शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला एनओसीची आडकाठी

By admin | Updated: November 26, 2014 23:02 IST

राज्यात हमी भावाने कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी करणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे पणन महासंघाने लगभग सुरू करीत जागेचा शोध घेणे सुरू केले. परंतु पणन महासंघाने

भाडे थकीत : जिनिंग संचालकांचा जागा देण्यास नकारप्रविण खिरटकर - वरोराराज्यात हमी भावाने कापूस उत्पादक पणन महासंघ कापसाची खरेदी करणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे पणन महासंघाने लगभग सुरू करीत जागेचा शोध घेणे सुरू केले. परंतु पणन महासंघाने आजही अनेक खासगी जिनिंगचे थकीत भाडे अदा केले नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पणन महासंघास अनेक ठिकाणी कापूस संकलन केंद्राला जिनिंग मालकांनी नारहकत प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरातच पणन महासंघाला कापूस खरेदीचा शुभारंभ करता आला नाही. कापूस उत्पादक पणन महासंघाने स्वत:चे जिनिंग नसल्याने राज्यात पणन महासंघ खासगी जिनींग भाड्याने घेऊन कापूस खरेदी करीत असते. ज्या जिनिंग सुरू आहे किंवा बंद आहे, अशा जिनिंग नाहरकत प्रमाणपत्र घेत असतात. अशा नाहरकत प्रमाणपत्राकरिता पणन महासंघ खासगी जिनिंग संचालकांना आॅक्टोबर महिन्यात पत्र पाठवित असते. आज दोन महिन्याचा कालावधी लोटूनही पणन महासंघास नाहरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे पणन महासंघाची कापूस खरेदी या सत्रात सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे. खासगी जिनिंग भाड्याने घेतल्यावर जागेचा किराया, कापसावर प्रक्रिया करण्याचे काम पणन महासंघ खासगी जिनिंग संचालकांवर सोपविते. हा किराया काढण्याकरिता खासगी जिनिंग संचालकांना मोठी पायपीट करावी लागते. यामुळे अनेक खासगी जिनिंगचे भाडे अजूनही पणन महासंघाकडे थकीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पणन महासंघासमोर कापूस खरेदीकरिता लागणाऱ्या जागेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. पणन महासंघाकडे कापूस विकल्यास बोनस मिळतो. परंतु पणन महासंघाची खरेदी सुरू नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकल्यास बोनस मिळणार किंवा नाही, या संभ्रमावस्थेत कापूस उत्पादक शेतकरी सापडले आहेत. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्यात पणन महासंघाद्वारे कापूस खरेदीची घोषणा केली. त्यामुळे आजही अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे. अगदी आतूरतेने ते पणन महासंघाच्या खरेदीची वाट बघत आहे. त्यामुळे अधिक दिवस कापूस घरात ठेवल्यास त्याचा सांभाळ कसा करावा व जोखीम कशी पत्करावी, असा प्रश्नही पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली नसल्याने शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.