शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘से नो टू क्राईम’ उपक्रम ठरतोय गुन्हेगारीवर मलम

By admin | Updated: February 3, 2017 01:03 IST

समाजात गुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरतात ते नागरिक, विद्यार्थ्यांमधील व्यसनाधिनता.

जिल्ह्यातील क्राईम रेट घटला : संदीप दिवाण यांची माहितीचिमूर: समाजात गुन्हेगारी वाढविण्यास कारणीभूत ठरतात ते नागरिक, विद्यार्थ्यांमधील व्यसनाधिनता. व्यसनाधीनता कमी करण्यासाठी समाजात जागृती करण्यासाठी काही उपक्रम राबविले तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम होतो. चंद्रपूर जिल्ह्यात एक वर्षाअगोदर झालेली दारुबंदी, यामुळेही काही प्रमाणात गुन्हेगारी कमी झाली. यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी समाजातील विद्यार्थी जीवनात समपुदेशन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात ‘से-नो टू क्राईम’ हा महाविद्यालयात पोलीस विभागाकडून उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाने जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी दिली.चिमूर येथे पत्रकार असोसिएशनच्या वतीने आयोजित शालेय समूह नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते चिमुरात आले होते. प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा शिल्पा राचलवार, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक, विक्रीकर निरीक्षक रवींद्र गायगोले, ठाणेदार दिनेश लबडे, बांधकाम विभागाचे मंत्रालयातील मुख्य अभियंता डॉ. महेश डेकाटे, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जगन्नाथ दडवे, डॉ. अश्विन अगडे, अमोल कोल्हे उपस्थित होते.संदीप दिवाण पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर शहराला क्रांतीचा वारसा असल्याने चिमूरचे विशेष महत्व आहे. जिल्हात से-नो उपक्रमामधून महाविद्यालयातील तरुणामध्ये से-नो ड्रग्स, से-नो वाईन, से-नो ट्रप याबाबत जागृती केली. या जागृतीमुळे जिल्ह्यातील काही प्रमाणात क्राईम रेट कमी झाला आहे. समाजात व जीवनात शिस्त न पाडल्याने आपले नुकसान होते. यासाठी व्यसननाधिनता कारण ठरते. म्हणून विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. व्यसनामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे देशात वर्षाला जवळपास सात हजार पेक्षा जास्त नागरिक अपघातात बळी जातात. विद्यार्थ्यांचा जीवनात पालकांची भूमिका फार महत्वाची असते, असेही दिवाण यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.प्रास्ताविक प्रा. चुन्नीलाल कुडवे, संचालन स्वाती जामगडे, ज्योती खोब्रागडे यांनी केले तर आभार राजकुमार चुनारकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)