शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ना ग्रामपंचायत राहिली, ना नगरपंचायत झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणे व निवडणूक रद्द करणे पडले महागात भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली ...

निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणे व निवडणूक रद्द करणे पडले महागात

भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर भिसी नगरपंचायत होणार असल्याची पहिली अधिसूचना शासनाने काढली. त्यामुळे एकदा ग्रामपंचायत व काही महिन्यातच नगरपंचायत निवडणूक लढावी लागेल, त्यापेक्षा सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन थेट नगरपंचायत निवडणूक लढवायची, असा सर्व गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. एकूण ६७ पैकी ६६ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. निवडणूक रद्द झाली. भिसी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र सहा महिने लोटले तरी भिसी नगरपंचायत होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता स्थानिक सर्व राजकीय गट व जनताही हैराण झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज उचलल्याचा उमेदवारांना आता पश्चाताप होत आहे.

आपापल्या वाॅर्डातील परिचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावातील जनता हक्काने आपापल्या समस्या सोडवायची. पण आता ही सोयच उरली नाही. १७ सदस्य असलेल्या भिसी ग्रामपंचायतीवर आता किती काळ प्रशासकाची सत्ता राहील, हा प्रश्न नेते व उमेदवारी अर्ज उचलणाऱ्यांना सतावत आहे. अरविंद रेवतकर गट, धनराज मुंगले गट, किशोर मुंगले गट, वंचित आघाडी गट, अनेक अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.

आपण फॉर्म उचलले नसते तर गावावर ही पाळीच आली नसती, असे मत व्यक्त करताना तत्कालीन उमेदवार दिसतात. प्रशासक व प्रभारी ग्रामसचिव या दोघांच्या खांद्यावर भिसीसारख्या सतरा ते अठरा हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावाचा भार आहे. दोन अधिकाऱ्यांना कामाच्या मर्यादा आहेतच. त्यामुळे लोकांचे वेळेत प्रश्न सोडविणे व विकासही करणे यालाही मर्यादा पडतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करण्यात आले. नगरपंचायतीची सगळी प्रक्रिया थांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, लवकरात लवकर भिसी नगरपंचायतीची निर्मिती करून निवडणूक घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नगरपंचायत निर्मितीची प्रक्रिया थांबली होती. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत नगरपंचायत निर्मितीचा कार्यक्रम निघू शकतो. त्यानंतर प्रभागनिर्मिती, मतदारयाद्या, परिसिमन इत्यादी कामे होतील. नगरपंचायत निर्मितीला वेळ लागेल, नेमका किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. आता प्रशासकांमार्फतच गावाचा कारभार चालेल.

-संजय नागटिळक,

तहसीलदार, चिमूर.