शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

मनपा सुरू करणार प्लास्टिक संकलन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:06 IST

शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरोबरच घरी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल, यासाठी योजना आखण्याचे काम सध्या पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच मनपातर्फे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू होणार आहे.

ठळक मुद्देव्यापारी संघाची बैठक : उपाययोजनेची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरोबरच घरी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंची कशा प्रकारे विल्हेवाट लावता येईल, यासाठी योजना आखण्याचे काम सध्या पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे. त्यामुळे लवकरच मनपातर्फे प्लास्टिक संकलन केंद्र सुरू होणार आहे.व्यापारी संघांची बैठक सोमवारी मनपा सभागृहात आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शंभर टक्के प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याची तयारी महानगरपालिकेने सुरू केली असून चंद्रपूरकरांना आपल्या घरातील प्लास्टिकची विल्हेवाट लावता यावी, यासाठी पालिकेच्या तिनही झोन कार्यालयांमधे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु करण्यात येणार आहे.बहुतेक घरी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, अन्य वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. नागरिक घरातील प्लास्टिक वस्तू या केंद्रावर जमा करू शकतात. तसेच शहरात प्लास्टिक वस्तू जमा करण्यास फिरते ‘कचरा संकलन वाहन’ सुरु करण्यात येणार आहे. जमा झालेल्या प्लास्टिक वस्तूंची मनपातर्फे शासन निर्देशाप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल. व्यापारी, नागरिकांनी संकलन केंद्र किंवा फिरते वाहन यात प्लास्टिक जमा करावे. तसे न केल्यास व साठा किंवा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. प्लास्टिकमुक्त मोहिमेस व्यापारी मंडळे व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, शितल वाकडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन कापसे व सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वछता अधिकारी उपस्थित होते.