शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी १४ डिसेंबरपासून संपावर

By admin | Updated: December 6, 2015 00:51 IST

महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी एक-दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

प्रशासनाविरोधात रोष : विविध मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्षचंद्रपूर : महानगरपालिकेत कार्यरत कर्मचारी मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी एक-दीड वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यात असंतोष व्यक्त होत आहे. १३ डिसेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास १४ डिसेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.मनपा कर्मचाऱ्यांची अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, मंजूर आकृतिबंधातील पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना समावेशन, पदस्थापना करावी, वरिष्ठ पदांचा कार्यभार काढण्यात यावा, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची मर्यादा वाढवावी, १५ टक्के नक्षल प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, सफाई विभागातील वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना जवळच्या झोनमध्ये नियुक्त करावे, वर्ग चारच्या सफाई कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती द्यावी, वाहनचालक म्हणून काम करीत असलेल्या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना वाहनचालक पदावर पदोन्नती द्यावी, फायरमन म्हणून काम करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना फायरमनपदावर नियुक्ती द्यावी, यासह अन्य मागण्या मनपा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून या मागण्या करण्यात आल्या असल्या तरी महानगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, हे विशेष.भारतीय नगर परिषद कामगार संघाच्या पुढाकारातून होणाऱ्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश मुंजे, सुरेश आंबेकर, तुकड्यादास डुमरे, सारंग निर्मळे, सचिन माकोडे, वासंती बहादुरे, बेनेहर जोसेफ, विवेक पोतनूरवार, भूपेश गाठे, प्रदीप मडावी, संतोष गर्गेलवार, मनोज सोनकुसरे, महेंद्र हजारे, उदय मैलारपवार, अनिरुद्ध राजूरकर, मधुकर चिवंडे, मधू श्रीरामे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)