शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
3
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
4
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
5
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
6
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
7
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
8
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
9
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
10
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
11
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
12
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
13
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
14
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
15
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
16
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
17
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
18
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
19
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
20
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या शाळांची आज वाजणार घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.त्यानुसार येथील शिक्षण विभागाने ज्या शाळा सुरू होणार आहे, त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे बजावले होते. त्यामुळे सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये उत्साह : आठ महिन्यानंतर शाळा-महाविद्यालयात होणार किलबिलाट

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केले. हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. बाजारपेठा उघडल्या.मात्र शाळा, महाविद्यालये आठ महिन्यांपासून बंदच आहे. आता शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये उघडण्याची परवानगी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सोमवारपासून शाळांची घंटा नियमित वाजणार आहे.शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.त्यानुसार येथील शिक्षण विभागाने ज्या शाळा सुरू होणार आहे, त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे बजावले होते. त्यामुळे सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स आॅक्सीमीटर, हात धुण्यासाठी साबन व पाणी आदींची सुविधा ठेवण्यात आली आहे. तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दररोज करण्यात येणार आहे.  याशिवाय शाळेत कोणत्याही विद्याथ्यार्ला लक्षणे दिसली तर त्याला घरी पाठविले जाणार आहे.खासगी शाळांचा टेस्टसाठी विद्यार्थ्यांना फतवाशाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने शिक्षकांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य  केले आहे. मात्र विद्यार्थ्यांना चाचणी करणे बंधनकारक नाही. तरीही चंद्रपुरातील काही खासगी शाळा विद्यार्थ्यांना त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यास भाग पाडत आहे. संपूर्ण अहवाल दिल्यावरच शाळेत प्रवेश देऊ, असा फतवा काढला आहे.

एका बेंचवर एकच विद्यार्थीशाळेतील गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसºया दिवशी या प्रकारे एक दिवसआड विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जाणार आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यात येणार आहे. शाळेत जेवणाची सुटी नसेल.

३४ शिक्षक पॉझिटिव्हशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी २२ नोव्हेंबरपर्यंत कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील चार हजार ३०६ शिक्षकांनी आतापर्यंत कोरोना चाचणी केली आहे. यातील ३४ शिक्षक पॉझिटिव्ह निघाले आहेत.शाळा सुरू होण्याची जय्यत तयारी बघण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांनी आठ ते १० शाळांना रविवारी भेटी दिल्या. यात शाळांचे निर्जंतुकीकरण झाले काय, बसण्याची व्यवस्था व इतर बाबी तपासून पाहिल्या.  

विद्यार्थ्यांना न्यावे लागणार संमती पत्रविद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आॅनलाईन गृहपाठाची व्यवस्था केली जाणार आहे. 

टॅग्स :SchoolशाळाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या