शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात नऊ हजार चंदन वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 14:19 IST

वरोरा येथील हरित मित्र परिवाराने शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी नऊ हजार वृक्षांची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला. तीन वर्षांपासून ही मोहीम सुरू असून चंदनाचे वृक्ष बघण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी वरोरा परिसराला भेटी देत आहेत.

ठळक मुद्देशेतकरी देत आहेत भेट प्रतिकूल हवामानातही हरित सेनेचे धाडस

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुक्यातील वातावरण चंदन वृक्षांसाठी प्रतिकूल असल्याने मागील अनेक दशकांपासून हे वृक्ष लागवड करण्यास कुणी धजावत नाही. मात्र, वरोरा येथील हरित मित्र परिवाराने शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी नऊ हजार वृक्षांची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला. तीन वर्षांपासून ही मोहीम सुरू असून चंदनाचे वृक्ष बघण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी वरोरा परिसराला भेटी देत आहेत.वरोरा शहरातील किशोर उत्तरवार, स्वप्नील देवाळकर, अविनाश देवतळे व काही मित्र एकत्र येवून हरित मित्र परिवार संघटनेची स्थापना केली. वरोरा शहर व ग्रामीण भागात चंदन वृक्ष लावण्याचा संकल्प जाहीर केला. हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याकरीता इंटरनेट व वर्तमानाच्या माध्यमातून चंदन लागवड करण्यासाठी त्यांनी चंदन वृक्षतज्ज्ञांशी संपर्क साधला. अद्यायवत माहिती संकलित करून चंदनाची शेती बघण्यासाठी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या तालुका निलंगा येथील होजूर हे गाव गाठून दत्तात्रय बगदुरे यांच्या बारा एकरातील चंदनाची शेती बघितली. मराठवाड्यात पाण्याची चणचण असतानाही ही शेती हिरवीगार असल्याचे पाहून युवक आनंदीत झाले. दरम्यान, बगदूर यांच्याकडून चंदन शेतीची संपूर्ण माहिती घेतली. वरोरा शहर व ग्रामीण भागात दोन हजार चंदनाचे रोपटे आणून जवळचे मित्र आणि शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सुरू केली. परिणामी, आज वरोरा शहर व ग्रामीण भागात नऊ हजार चंदनाचे वृक्ष सात ते दहा फुट उंचीपर्यंत मोठी झाली आहेत. हे वृक्ष डौलाने उभे असल्याचे दिसत असून चंदनाचे रोपटे दिलेल्या घरी व शेतात हरित मित्र परिवाराचे सदस्य प्रत्येकाच्या घरी जावून वृक्ष संगोपनाची माहितीही नि:शुल्क दिली जात आहे. चंदन वृक्षाच्या गाभ्यापासून विविध मूर्त्या तयार करता येतात. सौंदर्य प्रसाधनातही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चंदनाचे तेल बहुउपयोगी आहे. संस्कृतमध्ये चंदन वृक्षाला ‘शर्विलक’ असे म्हणतात. याचा अर्थ चंदनाचे वृक्ष स्वत:च्या वाढीकरिता इतर वृक्षाच्या मुळातून अन्न घेतो, असा होतो. चंदनाच्या वृक्षांची वनविभागात व सातबारावर नोंद करणे आवश्यक असून या वृक्षाबाबत पसरलेले गैरसमजही दूर होत आहेत.

टॅग्स :agricultureशेती