शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भूमिगत विद्युत वाहिनीसाठी नऊ कोटींचा निधी

By admin | Updated: August 10, 2016 00:29 IST

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात अखंडित विद्युत पुरवठा करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील पद्मापूर येथे...

सुधीर मुनगंटीवार: पद्मापूर येथे ३३/ ११ के. व्ही. विद्युत उपकेंद्रचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात अखंडित विद्युत पुरवठा करण्याच्या अनुषंगाने चंद्रपूर तालुक्यातील पद्मापूर येथे ३३/ ११ के. व्ही. विद्युत उपकेंद्राची निर्मिती तसेच पद्मापूर येथून मोहर्ली पर्यंत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी ९.५० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.शासनाच्या महसूल व वनविभागाने सोमवार ८ आॅगस्ट रोजीच्या पत्रान्वये सदर निधी उपलब्ध केल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर तसेच क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना कळविले आहे.राज्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र संवर्धन उत्कृष्टपणे झाल्याने मागील काही वर्षात प्रकल्पात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत भरीव वाढ झाली आहे. तसेच व्याघ्र प्रकल्पाचे नावदेखील जागतिकस्तरावर घेतले जात आहे. प्रकल्प क्षेत्रात भेट देण्यासाठी पाच ते सहा प्रवेशद्वारे आहेत, तथापि मोहर्ली येथून जाण्यास पर्यटकांची प्रथम पसंती असते. त्यामुळे मोहर्ली व त्या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली असून, पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी अनेक साधने तयार झाली आहेत. प्रकल्पास भेट देणाऱ्या पर्यटकांना मोहर्ली व परिसरात अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी या परिसरात विद्युत पुरवठयाबाबत अनेकदा समस्या निर्माण होतात. या समस्येवर उपाययोजना म्हणून पद्मापूर येथे विद्युत उपकेंद्र उभारणी करणे व मोहर्लीपर्यंत भूमिगत विद्युतवाहीनी जोडणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून हे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)