शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निम्या अंगणवाडी केंद्रांचे शौचालय नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:20 IST

चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडी केंद्रातून होत असते. अंगणवाडीतूनच शाळेत येण्याची बालकांत आवड निर्माण केली जाते.

ठळक मुद्देमूल तालुका : चिमुकल्यांना सुविधा देण्यात प्रशासन अपयशी

भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्रीगणेशा अंगणवाडी केंद्रातून होत असते. अंगणवाडीतूनच शाळेत येण्याची बालकांत आवड निर्माण केली जाते. मात्र या अंगणवाडी केंद्रातून बालकांना मुलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे वास्तव मूल तालुक्यातून दिसून आले. तालुक्यातील निम्या अंगणवाडी केंद्रामधील शौचालये नादुरूस्त असून याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.मूल तालुक्यातील १५४ अंगणवाडी केंद्रापैकी ११ ठिकाणी आजही स्वतंत्र इमारत नाही. ज्याठिकाणी अंगणवाडी आहे, त्यातील ३२ अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची स्थिती बिकट आहे. तर ३० अंगणवाड्यात शौचालयच नाही. काही अंगणवाड्यात पाण्याचीही व्यवस्था नाही. ग्रामीण भागात एकात्मीक बालविकास सेवा योजनेतून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. कुपोषण कमी करणे, त्यासाठी बालकांना पूरक पोषण आहार देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. मात्र याच अंगणवाड्यांमध्ये बालकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचा विरोधाभास आहे. एकीकडे विकासाचे ढोल वाजविणे सुरू असताना अंगणवाड्यातील बालकांना पिण्याचे पाणीही मिळत नाही ही, शोकांतिका आहे. विशेष म्हणजे, अंगणवाड्यातील बालकांच्या आरोग्यासाठी प्रचंड खर्च केला जातो. त्यातून नेमका कोणाचा विकास साधला जात आहे, ही बाबही शोधणे गरजेचे आहे. तालुक्यातील चिचोली, दाबगांव मक्ता, विरई, नवेगाव आणि येजगाव येथे मीनी अंगणवाडी आहे. करवन कोटा येथील अंगणवाडीच्या बांधकामासाठी एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. तर बोरचांदली येथे दोन आणि नांदगाव येथे तीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अंतिम टप्पात आहे.ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र आहेत. परंतु, शौचालय नाही, त्याठिकाणी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. जुने शौचालय दुरूस्तीसाठीही प्रस्ताव पाठविण्यात आले असून अंगणवाडी केंद्रात पाण्याची सोय व्हावी यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवकांची भेट घेतली.- एस. एस. पवारएकात्मीक बालविकास प्रकल्प अधिकारी, मूल.