शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मास्तरांच्या गावातील निकेशची विदेश भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:22 IST

पांजरेपार या लहानश्या गावातील निकेश वामन उरकुडे हा युवक नुकताच युनायटेड किंग्डम (युके) देशात इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. त्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पांजरेपार या लहानश्या गावातील निकेश वामन उरकुडे हा युवक नुकताच युनायटेड किंग्डम (युके) देशात इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. त्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.पांजरेपार या गावाची तशी मास्तरांचे गाव म्हणून पंचक्रोशीत ओळख आहे. ७०० ते ८०० लोकसंख्येच्या या गावात किमान ६० ते ६५ तरी व्यक्ती शिक्षकी पेशात आहेत. यात जि.प.च्या शिक्षकांपासून तर प्राध्यापकांचाही समावेश आहे. गावाची अशी पार्श्वभूमी असलेल्या निकेशचे प्राथमिक शिक्षण पांजरेपार येथीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. पुढे अकरावीला जनता विद्यालय नागभीड येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व बारावीमध्ये उत्तम यश प्राप्त करत अमरावती येथून बी.ई. ची पदवी घेतली. त्यानंतर विविध कंपन्यांमध्ये नोकरी करत तो नुकताच युनायटेड किंग्डम या देशात मास्कटेक कंपनीत सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीसाठी रवाना झाला. निकेशच्या घरची परिस्थिती सामान्य आहे. घरी शेती आणि छोटासा किराणा दुकान असून शेती आणि किराणा दुकानात तो स्व:ताही काम करायचा. पण परिस्थितीला आड न येऊ देता, निकेशने जिद्दीने परिस्थितीशी लढा देत त्याने यश संपादन केले आहे.निकेश लहानपणापासूनच मेहनती व जिद्दी होता. त्याने परिस्थितीशी झुंज देऊन यश संपादन केले. एखादी गोष्ट त्याने करायची ठरविली की, ती तडीस कशी न्यायची, या खटपटीत तो असायचा.- सुनील नवघडेनिकेशचे प्राथमिक शिक्षक