शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

रात्रपाळीत अधिकारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:25 IST

मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९५ टक्के कर्मचारी कार्यरत आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागातील रुग्णांनी जावे कुठे ? : तालुक्यातील आरोग्य केंद्रांमधील वास्तव

भोजराज गोवर्धन ।आॅनलाईन लोकमतमूल : मूल तालुक्यातील मारोडा, राजोली, बेंबाळ आणि चिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी ९५ टक्के कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु यापैकी बहुतांश कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. रात्रपाळीत तर या केंद्रांमध्ये कुणीच राहत नसल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. या प्रकारामुळे रुग्णांची चांगलीच हेळसांड होत आहे.तालुक्यातील मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. परंतु एका डॉक्टराच्या भरोशावर मारोड्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संध्या गुरुनुले यांच्या या क्षेत्रामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची नेहमीच कमतरता असते. या आरोग्य केंद्रातील एक महिला डॉक्टर मागील एक वर्षापासून गैरहजर आहे. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग त्या डॉक्टरांना अभय देत आहे. मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मडावी हे कार्यरत आहे तर राजोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चरपे हे याठिकाणी बुधवार आणि गुरुवार यादिवशी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. तर भादुर्णी येथील उपकेंद्रामध्ये डॉ. माधुरी टेंभे तर राजगड उपकेंद्रामध्ये डॉ. मिना मडावी या कार्यरत आहेत. मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले अनेक कर्मचारी मुख्यालयाबाहेर राहतात, हे लोकमतच्या पाहणीत आढळून आले आहे. रात्र पाळीत तर हे अधिकारी सेवेत नसतातच. याठिकाणी परिचर दोन आणि वाहन चालकाचे एक पद रिक्त आहे.बेंबाळ प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलंगेकर यांची बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी गोवर्धन येथील अ‍ॅल्युपेथीक उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शितलप्रसाद महेशकर यांनी पदभार स्वीकारलेला आहे. याठिकाणी डॉ. जुनघरे कार्यरत आहे. तर राजोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सुमेध खोब्रागडे कार्यरत आहे. येथील प्रशासन व्यवस्थित असल्यामुळे याठिकाणी रुग्णांची कोणतीही तक्रार असल्याचे दिसून आले नाही, याठिकाणी परिचर एक पद रिक्त आहे. मूल तालुक्यातल चारही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले असून काही आरोग्य केंद्रात अस्वच्छता पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ११० गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी मूल तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रासोबत १६ उपकेंद्र, एक आयुर्वेदीक तर तीन अ‍ॅल्युपॅथीक आरोग्य केंद्र चालविले जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही लक्ष नाहीमारोडा आरोग्य केंद्रातून अनेक रुग्णांना मूल- चंद्रपूरला रेफर केले जाते. याबाबत अनेकदा तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु तालुका वैद्यकीय अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया मारोडा ग्रामपंचायतचे सदस्य पप्पु पुल्लावार यांनी दिली.चिरोली केंद्रात अस्वच्छताचिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० टक्के पदे भरण्यात आलेली आहेत. परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता लोकमतच्या पाहणीत दिसून आली. चिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर कन्नाके यांची सिरोंचा येथे पदोन्नती झाली असून त्यांच्याठिकाणी डॉ. रायपुरे हे नुकतेच रुजू झालेले आहे. याठिकाणीही परिचराचे दोन पदे रिक्त आहेत.मारोड्याचे आरोग्य केंद्र वाऱ्यावरमा.सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार वाऱ्यावर सुरु आहे. याठिकाणी औषधासाठा नाही. आरोग्य कर्मचारी आलेल्या रुग्णाशी सौजन्याने बोलत नाही, अशा अनेक तक्रारी दिसून आल्या.