शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एक बादली पाण्यासाठी जागावी लागते रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:48 IST

खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.

ठळक मुद्देखापरी (ध.) येथे पाणीटंचाई : प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमुर : खापरी (धर्मु) गावातील पाण्याच्या विहिरी व बोअरवेल कोरडे पडले. नळयोजनेचे अन्य स्त्रोत आटल्याने चार दिवसांतून एकदाच पाणी येते. एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर जागावे लागत आहे.चिमूर शहरापासून दहा किमी अंतरावरील खापरी (धर्मु) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी २० वर्षांपूर्वी नळ योजना कार्यान्वीत करण्यात आली होती. तेव्हापासुन या योजनेतून खापरी येथील नागरिकांना पाणी मिळू लागले. मात्र बदलते वातावरण व उष्णतेने नळ योजनेचे सर्व स्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे नळाद्वारे चार दिवसाआड दोन बादली पाणी मिळणेही कठीण झाले. गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन सार्वजनिक विहिरी आहेत. सोबतच दोन बोरवेल असूनही पाणी मिळत नाही. विहिरीचे झ़रे कोरडे पडल्याने पाणी आटले. त्यामुळे नागरिकांना बादलीभर पाण्यासाठी रात्री जागावी लागते. दिवस उजाळला की पाण्याची चिंता सुरू होते. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महिला हैराण झाल्या आहेत. काही महिला शेतातील विहिरीवर पायपिट करून हंडाभर पाणी आणून दिवस काढत आहेत. बैलबंडी असणारे कुटुंब ड्रम भरुन पाणी आणून दैनंदिन गरज भागवित आहेत. खापरी गावात पाण्याचा गंभीर प्रश्न असतानाही प्रशासनाने याकडे अद्याप लक्ष दिले नाही, असा आरोप गावकरी करीत आहेत.गावातील पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेवून सरपंच प्रकाश मेश्राम यांनी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकाऱ्यांच निवेदनाद्वारे लक्ष दिले होते. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावी, अशी मागणी केली होती. मात्र अजुनही गावात उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी शिवारात भटकंती करावी लागत आहे. मागील वर्षीदेखील पाणी टंचाई निर्माण झाली होती. या गावात दरवर्षी हीच समस्या कायम असताना प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना केल्यास समस्या दूर होवू शकते. पण, लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने समस्या कायम आहे.आधी पाणी, मग दुसरे कामगावात भीषण पाणी टंचाई असल्याने गावातील महिला व पुरुष प्रथम पाण्यालाच सर्वप्रथम महत्त्व देत आहेत. बादलीभर पाणी मिळाल्यानंतरच दुसरे काम करतात, अशी परिस्थिती गावात निर्माण झाली. पाण्यासाठी विहिरी व दोन बोरवेल असूनही निराशा वाट्याला येत आहे. २० वर्षांपूर्वी उभारलेल्या नळ योजनेसाठी कायमस्वरूपी जलस्त्रोत निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.टॅकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तहसीलदार, सवर्ग विकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला निवेदन दिले. मात्र प्रशासनाने गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.- प्रकाश मेश्राम,सरपंच, ग्रामपंचायत खापरी