शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नवविवाहितेची आत्महत्या नसून हत्याच

By admin | Updated: August 26, 2015 00:43 IST

चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावानजीकच्या विहिरीमध्ये आढळून आला.

मृतदेह नेण्यास नकार : रूग्णालयात तणाव वरोरा : चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावानजीकच्या विहिरीमध्ये आढळून आला. नवविवाहितेची आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप माहेरच्यांनी करीत शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वरार येथे दिनकर जीवतोडे यांच्याशी भद्रावती तालुक्यातील पावना (रै) येथील संभाजी जांभुळे यांच्या वृंदा नामक मुलीचा विवाह मे २०१५ मध्ये झाला. वृंदा काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. त्यानंतर सासरी परत गेल्याच्या दोन दिवसानंतर वरार गावानजीकच्या बापू दडमल यांच्या शेतातील विहिरीमध्ये वृंदाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. मृत वृंदाच्या शरीरावर जखमाही असल्याने तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करुन विहिरीत टाकल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. मृत वृंदाचा माहेर पावना गावातील नागरिकही उपजिल्हा रुग्णालयात गोळा झाले. जोपर्यंत दोषी असणाऱ्यांंना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने उपजिल्हा रुग्णालयात तणाव सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात मृत वृंदाच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वृत्त लिहेपर्यंत मृतदेह शवविच्छेदन होवूनही शवविच्छेदन कक्षातच ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)