शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू

By admin | Updated: June 11, 2016 01:12 IST

जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवजात बाळ दगावल्याची घटना ३० मे रोजी घडली असून,

कारवाईची मागणी : पित्याचा पत्रकार परिषदेत आरोपचंद्रपूर : जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नवजात बाळ दगावल्याची घटना ३० मे रोजी घडली असून, याप्रकरणात संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संदीप यादव कोटरंगे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केली.संदीप कोटरंगे यांनी पत्नी रिना कोटरंगे हिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात २९ मे रोजी सकाळी भरती केले. सकाळी १०.५० वाजता त्यांना पुत्ररत्न झाले. ३० ला लसीकरण करण्यात आल्यानंतर त्याला ताप आला. रात्रीच्या सुमारास अचानक ताप वाढल्यानंतर संदीप कोटरंगे यांच्या पत्नी रिना आणि सासू या दोघींनी स्टॉपरूमकडे धाव घेऊन दरवाजा ठोठावला. परंतु, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा परिचारिकांना आवाज दिला. मात्र, त्यांनी बाळाची प्रकृती तपासली नाही किंवा साधी चौकशीही केली नाही. यातच काही वेळात बाळाची हालचाल थांबली. यानंतर बाळाला घेऊन रिना या नर्सकडे गेल्या असता, उपस्थित परिचारिकांनी त्यांना खालच्या माळ्यावर पाठविले. परंतु, तोपर्यंत बाळ दगावले होता. परिचारिका आणि डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे आणि उपचार करणे आवश्यक असताना जिल्हा रुग्णालयात परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून नेहमीच निष्काळजी केली जात असल्याचा आरोपही संदीप कोटरंगे यांनी यावेळी केला. याप्रकरणाची तक्रार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुनघाटे यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी चार दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनपर्यंत याप्रकरणात कुणावरही कारवाई न झाल्याने परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे समर्थन येथे केला जात असल्याचा आरोप संदीप कोटरंगे, रत्नमाला कावळे, नंदा कोटरंगे, राहुल बालमवार, विवेक धोटे, प्रकाश नागरकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)