शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

वीज चोरीच्या गुन्ह्यांसाठी नवे पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:11 IST

वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी विदर्भ परिक्षेत्राकरिता नागपूर येथे एकमेव पोलीस ठाणे होते.

ठळक मुद्देवीज चोरीला बसणार आळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी विदर्भ परिक्षेत्राकरिता नागपूर येथे एकमेव पोलीस ठाणे होते. मात्र, नवे पोलीस ठाणे निर्माण होणार असल्याने वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुकर होणार आहे.नव्या पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंचाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारकांशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांची प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल. साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार आहे. मोठ्या शहरांमध्ये पाच पोलीस ठाण्यांना वीज चोरी बाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे सहा पोलीस ठाणे बंद करण्यात आले. वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात महावितरण चंद्रपूर परिमंडळातील जिल्ह्यात चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, जिवती व मूल पोलीस स्टेशन असे तीन तर गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी व अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविता येणार आहे, अशी माहिती वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.दोन कोटींची वीजचोरीचंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली मंडळात आतापर्यंत १ हजार २९५ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली. त्यांनी दोन कोटी ४३ लाखांची वीज चोरी केल्याचे आढळले. चंद्रपूर मंडळाने १ एप्रिल २०१७ पासून १ कोटी ५८ लाख रुपयांच्या वीज चोऱ्या एकट्या चंद्रपूर मंडळात उघडकीस आणल्या आहेत. महावितरणने केलेल्या कारवाईत ६४१ वीज चोरांवर गुन्हे दाखल झाले. चंद्रपूर विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ४५६ च्या वीजचोºया उघडकीस आल्या.