शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर बसस्थानकावर हार्वेस्टींगसाठी नवीन पाईप लाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:42 IST

बल्लारपूर येथील आधुनिक बस स्थानकाच्या वॉच टॉवर जवळ पावसाचे पाणी बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त पाईपलाईन लावण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला समज देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराला समज : आवश्यक बदल करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर येथील आधुनिक बस स्थानकाच्या वॉच टॉवर जवळ पावसाचे पाणी बाहेर टाकण्यासाठी अतिरिक्त पाईपलाईन लावण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत कंत्राटदाराला समज देण्यात आली आहे. यासंदर्भातील अन्य कंत्राटदारांनादेखील तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्य परिवहन महामंडळाचे चंद्रपूर विभागीय नियंत्रकांनी दिले आहे.बल्लारपूर येथील आधुनिक बसस्थानक हे संपूर्ण जिल्ह्यात प्रेक्षणीय असे बसस्थानक बनले आहे. या ठिकाणी बसस्थानकाचे संपूर्ण काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात आले आहे. तथापि, रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेमुळे अतिरिक्त पाणी छतावर साचते. यामुळे वॉच टॉवरजवळील सिलिंग निघाले होते. मात्र अतिरिक्त पावसामुळे झालेला हा अपघात असून यामध्ये बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असे म्हणता येत नाही. प्रत्येक नव्या इमारतीमध्ये हार्वेस्टिंग सध्या करणे आवश्यक आहे. हे करीत असताना छतावर पाणी थांबते. पाणी थांबल्यामुळे हा अपघात झाला होता.या संपूर्ण घटनेची नोंद घेतली असून या इमारतीचे वास्तू विशारद, संबंधित स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे. वॉच टॉवर जवळील छताच्या नालीला दोन मोठे ११० मिलीमीटरचे छिद्र करून पावसाचे पाणी काढण्यासाठी अतिरिक्त पाईप लाईन जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर काम सुरू असताना पाऊस आल्यास नालीमधून रॅलीद्वारे करण्यात आलेल्या छिद्रातून पाणी गळती होऊन सिलिंगमधून पाणी येऊन वॉच टॉवर जवळच्या भागात पाणी गळती होऊ शकते. काम पूर्ण झाल्यावर ही समस्या नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.अभूतपूर्व वास्तूची काळजी घेऊ-विभागीय नियंत्रककंत्राटदारांना व अन्य संबंधित यंत्रणेला या बसस्थानकाच्या आधुनिकतेला जपताना पुन्हा असे प्रकार होणार नाही, याची काळजी घेण्याबाबत बजावण्यात आले आहे. बल्लारपूर बसस्थानक हे जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण प्रवासी निवारा असून त्याच्या आधुनिकतेला व सौंदर्यीकरणाला कोणताही बाधा होणार नाही. याबाबत राज्य परिवहन मंडळ काळजी घेईल, असेही विभागीय नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.अंतरिम देयक थांबविलेयासंदर्भात पाऊल उचलत विभागीय नियंत्रकांनी कंत्राटदाराचे अंतिम देयक आणि सुरक्षा रक्कम तसेच संबंधित वास्तुविशारदाचे देयकसुद्धा थांबवून ठेवलेले आहे. प्रवाशांची सुरक्षा तसेच नव्याने उभारलेल्या इमारतीची प्रतिष्ठा यामध्ये तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.