शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

नव्या आरोग्य केंद्रांचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:41 IST

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सन २०१३ ला जिल्ह्यात पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी दिली होती.

जागेची अडचण : तीन वर्ष लोटूनही प्रशासकीय कार्यवाहीला चालढकल चंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सन २०१३ ला जिल्ह्यात पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी दिली होती. मात्र तीन वर्षाचा काळ लोटूनही शेनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता या आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला सुरूवात झालेली नाही. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सध्यास्थितीत ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. मात्र अनेक गावातील नागरिकांना उपचारासाठी लांबवर जावे लागत आहे. रूग्णांची ही अडचण लक्षात घेता क्षेत्रफळाचा विचार करून राजुरा तालुक्यातील विरूर स्टे., कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, जिवती तालुक्यातील शेनगाव, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी व आणखी एका ठिकाणी पाच नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तत्कालीन आघाडी सरकारने मंजूरी दिली. लवकरच या आरोग्य केंद्रांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून नव्या पदभरतीला मंजूरी मिळण्याची आशा होती. मात्र तीन वर्षे लोटूनही शेनगाव आरोग्य केंद्र वगळता इतर आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी जागा मिळू शकलेली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होताच ठराव घेऊन जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची होती. यासाठी पाचही गावातील ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात ठराव घेतले. मात्र जागा उपलब्ध होवूनही प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजूरी मिळूनही नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. सध्यास्थितीवरून या रूग्णालयांची कामे आणखी दोन-तीन वर्षे पूर्ण होण्याची कोणतेही चिन्ह नसून नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पोंभुर्णा व जिवती रूग्णालयाचा दर्जा जैसे-थेतत्कालीन आघाडी सरकारने जिल्ह्यात पाच नवीन प्राथमिक आरोग्य कें द्रांना मंजूरी देतानाच, पोंभुर्णा व जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रूग्णालय म्हणून श्रेणीवर्धन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे रूग्णालयात भौतिक सुविधात वाढ होवून रूग्णांची होणारी गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तीन वर्षे लोटूनही या रूग्णालयांना ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा न देता सुविधात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या आहेत जागेच्या अडचणी विरूर स्टे. आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली असली तरी बांधकामाचे टेंडर कार्यवाहीत असल्याचे सांगितले जात आहे. भंगाराम तळोधी येथेही हीच स्थिती आहे. नांदाफाटा येथील आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली. उपलब्ध जागा गायरान जागा असल्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला प्रस्ताव पुन्हा तहसीलदारांकडे परत पाठविण्यात आला आहे.जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबधीत ग्रामपंचायतींची आहे. जागेची अडचण येत असल्याने शेनगाव वगळता इतर आरोग्य केंद्राचे काम सुरू झालेले नाही. इमारत बांधकाम ७० टक्के पूर्ण झाल्याशिवाय पद भरतीला मंजूरी मिळू शकत नाही. या प्रक्रियेला आणखी काही दिवस लागतील. - श्रीराम गोगुलवारजिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.