शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या शैक्षणिक इतिहासात नवा अध्याय

By admin | Updated: September 1, 2015 00:42 IST

चंद्रपूरच्या शैक्षणिक इतिहासात १ सप्टेंबर हा दिवस सूवर्ण अक्षरांनी लिहला जाणार आहे.

मेडिकल कॉलेजचा आज श्रीगणेशा : ८५ विद्यार्थ्यांचा प्रवेश, डीन व जिल्हाधिकारी करणार मार्गदर्शनचंद्रपूर : चंद्रपूरच्या शैक्षणिक इतिहासात १ सप्टेंबर हा दिवस सूवर्ण अक्षरांनी लिहला जाणार आहे. चंद्रपूर येथील बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्या १ सप्टेंबरला श्रीगणेशा होणार आहे. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधांचे सोपस्कर पूर्ण झाले असून पहिल्या दिवशी ९३ विद्यार्थी उपस्थिती दर्शविणार आहेत. या विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. एस. एस. मोरे व जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर मार्गदर्शन करणार आहेत. अनेक वादविवादानंतर चंद्रपूर मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. कॉलेजला मंजुरी मिळताच जिल्हा प्रशासनाकडून कॉलेजसाठी लागणाऱ्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महानगरपालिकेचे शहर अभियंता, इंडियन मेडिकल असोशिएशनचे राज्य उपाध्यक्ष व इतर विभागाचे अधिकारी व कत्राटदारांच्या उपस्थित काही दिवसांपूर्वी बैठक घेऊन २८ आॅगस्टपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केली असून महाविद्यालय इमारत, वसतिगृह व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवास्थानामधील विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तसेच फर्नीचर व्यवस्था व फायर आॅडीट करण्यात आले आहे. मुलींची निवासी व्यवस्था जिल्हा शासकीय ग्रंथालयासमोरील राजे धर्मराव मनपा शाळेत करण्यात आली असून या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली आहे. तर महाविद्यालयाचीही इमारत रंगरंगोटीने सज्ज असून येथेही काही विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. प्रवेशासाठी यापूर्वीच नोडल अधिकाऱ्याची नेमणूक झाली. १०० विद्यार्थी क्षमता असलेल्या या महाविद्यालयात आतापर्यंत ८५ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला असून १५ मुलांचा प्रवेश केंद्र सरकार अखत्यारीत असून तोही लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)६० टक्के विद्यार्थी विदर्भातील एमसीआयच्या धोरणानुसार चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात ६० टक्के विद्यार्थी विदर्भातील आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता १०० इतकी असून उर्वरित विद्यार्थी हे इतर ठिकाणचे आहेत. या महाविद्यालयामुळे चंद्रपूर, गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण आता सोपे जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार लाभ चंद्रपूर येथील बहुप्रतीक्षित वैद्यकीय महाविद्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणे आता सोपे झाले आहे. दोन्ही जिल्हे मागास असल्याने वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्हा विकासाला हातभार लागून दुर्गम भागातील आरोग्य सुविधा भक्कम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.