शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नवदाम्पत्य विवाह नोंदणीत निरुत्साही

By admin | Updated: May 11, 2014 00:10 IST

लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. आयुष्यात एकदाच येणारा हा सुंदर क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, असे प्रत्येकाला वाटते.

राजकुमार चुनारकर - खडसंगी

लग्न पहावे करुन आणि घर पहावे बांधून, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. आयुष्यात एकदाच येणारा हा सुंदर क्षण धुमधडाक्यात साजरा करावा, असे प्रत्येकाला वाटते. पण लग्न घरात वाढती महागाई, हॉलचे भाडे, अन्नधान्याची नासाडी, याकडे लक्ष देत युवकांचा नोंदणी विवाहाकडे ट्रेन्ड वाढायला पाहिजे. मात्र संस्कृतीच्या नावावर याकडे दुर्लक्ष करुन विवाह आयोजित केले जात आहेत. विवाहासाठी अतिउत्साही असणारा नववर व परिवारतील लोक मात्र विवाहाच्या नोंदणीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. विवाहाच्या दोन पद्धती प्रचलित आहेत. त्यामध्ये नियोजित विवाह, प्रेमविवाह, नियोजित विवाहामध्ये वर व वधू यांच्या कुटुंबाच्या सहमतीने विवाह करण्यात येतो तर प्रेमविवाहामध्ये परिवाराचा विरोध असल्याने मुलगा व मुलगी पळून जावून मंदिरात किंवा कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह करतात. नोंदणी विवाह करण्याचा सर्वात मोठा आणि प्राथमिक फायदा म्हणजे नोंदणीमुळे पतीपत्नीच्या नात्यावर कायद्याची मोहर बसते. कोणत्याही नवदाम्पत्यासाठी ही कायदेशिर बाब पूर्ण होणे गरजेचे आहे. नोंदणी विवाहासाठी फक्त लग्नाच्या तारखेच्या महिनाभर आधी अर्ज करावा लागतो. हा अर्ज दुय्यम निबंधक यांच्याकडे द्यावा लागतो. याकरिता मात्र नोंदणी विवाहासाठी साक्षीदार, वयाचा दाखला, रहिवाशी पुरावा, पासपोर्ट फोटो द्यावा लागतो. नोंदणी झाल्यावर साक्षीदाराचा उपस्थितीत हा विवाह लावला जातो. त्यानंतर आठ ते पंधरा दिवसात दाखला देण्यात येतो. प्रत्येकाच्या लग्न करण्याच्या धार्मिक पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी लग्नाची प्रत्यक्ष नोंदणी होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. राज्यात विवाह नोंदणी अधिनियम १९९८ नुसार नोंदणी केली जाते. नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणेही नोंदणी न करण्यामागे असतात. वैदिक विवाह झाल्यानंतर किंवा थेट नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची सोय यात असते. मात्र वर्षभरानंतरही नोंदणी केल्यास मात्र दंड आकारला जातो. नवदाम्पत्यांनी विवाह नोंदणी ऐच्छिक मानू नये. ती महिलांच्या सामाजिक स्थितीशी निगडीत आहे. कारण एखाद्या पतीकडून होणार्‍या अन्यायाविरुद्ध कायद्याने प्रत्येक महिलेला दिलेला आधार आहे. विशेषत: ग्रामीण भागात कर्ज काढून मुलीचे लग्न बर्‍याच परिवाराकडून करुन दिले जाते. अशावेळी नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास खर्च वाचतो. पण ग्रामीण भागात स्त्रियांना आजही विवाह नोंदणीची माहिती नाही. हुंडा दिला नाही म्हणून स्त्रियांवर सासरकडून अत्याचार केला जातो. यामुळे घटस्फोटाचे प्रमाणही जास्त आहे. अशावेळी मात्र विवाहाची नोंदणी झाली असेल तर घटस्फोटाचेही मिळण्यास मदत होते. सोबतच मुलाचा ताबा कोणाकडे असावा, हे सुद्धा या कायद्यान्वये नमूद केले आहे. कारण अशावेळी नोंदणी विवाहाचा दाखलाच उपयोगी पडतो. शासनाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिल्याने अशा जोडप्यांना नोंदणी विवाह हाच अंतीम पर्याय ठरणार आहे.