शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सायगाटाच्या शिवारात नेदरलँडचे पाहुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:20 IST

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे सायगाटा येथील प्रगत शेतकरी शिवदास कोरे यांच्या शेतीला नेदरलँड येथील विदेशी पाहुण्यांनी भेट देऊन चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. शिवाय, कोरे यांच्या शेतीचे प्रयोग आणि भारतीय कृषी संस्कृतीची माहितीही जाणून घेतली.

ठळक मुद्देचटणी, भाकरीचा आस्वाद : कृषी संस्कृतीचा केला आदर

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे सायगाटा येथील प्रगत शेतकरी शिवदास कोरे यांच्या शेतीला नेदरलँड येथील विदेशी पाहुण्यांनी भेट देऊन चटणी-भाकरीचा आस्वाद घेतला. शिवाय, कोरे यांच्या शेतीचे प्रयोग आणि भारतीय कृषी संस्कृतीची माहितीही जाणून घेतली.राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कारप्राप्त सायगाटा येथील शेतकरी शिवदास कोर यांनी शेतीमध्ये विविध नाविण्यपूर्ण प्रयोग करतात. त्यामुळे शेतीला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेचे डॉ. सतीश गोगुलवार यांच्या माध्यमातून कोरे यांच्या शेतीची माहिती मिळाल्याने नेदरलँड येथील त्रियूली टोमारिलो, विटा टोमारिलो या दाम्पत्यांनी कन्या दिलनवाज वारीवा हिला सोबत घेऊन टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कोरे यांच्या शेतीला नुकतीच भेट दिली. सेंद्रीय खताच्या माध्यमातून कोरे यांनी विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. टोमारिलो यांची कन्या दिलनवाज ही मुंबई येथे वास्तव्याला आहे.तिनेच संवादकाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या का करतात याची कारणेही कोरे यांच्याकडून जाणून घेतली. पिण्याचे पाणी, स्वयंपाकाचे साहित्य, शेतीची विविध उपकरणे याविषयीही विदेशी पाहुण्यांनी माहिती टिपून घेतली. पाटे, सुप, वरवंटा, पाटी आदी जीवनापयोगी वस्तुंना त्यांनी कॅमेराबद्ध केले. शेतावरच्या बांद्यावरच कोरे यांचे कुटुंब वास्तव्याला राहत असल्याने त्रियूली टोमोरिलो विटा टोमोरिलो आणि कन्या दिलनवाज यांनी कोरे कुटुंबीयांसोबत चटणी भाकरीचा आस्वाद घेतला.