शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पराक्रमी आदिवासींची गाथा नव्याने लिहिण्याची गरज

By admin | Updated: January 12, 2015 22:46 IST

जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून

सुरेश द्वादशीवार यांचे प्रतिपादन : मूल येथे पार पडले एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रमूल : जन्मजातच आदिवासी जमात ही पराक्रमी आहे आणि साहित्याला कुठलीही जात नाही. परंतु जातीची विभागणी त्यांच्या-त्यांच्या कुलचिन्हावर विभागली आहे. म्हणून अशा चर्चासत्रांमधून आदिवासी जमातीची गाथा नव्याने संशोधन करुन लिहिण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे केले.स्थानिक कर्मवीर महाविद्यालयात ‘मराठी साहित्यात आदिवासी साहित्याचे योगदान’ या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सहकार महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षण आणि साहित्यातूनच समाजाला नवीन दिशा मिळत असते असे सांगितले. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. डॉ. राजन जयस्वाल, चर्चासत्राध्यक्ष मराठी संशोधन केंद्राच्या समन्वयक डॉ. माहेश्वरी गावित, मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे यांनीही आदिवासी साहित्यावर प्रकाश टाकला. तर चर्चासत्राचे आयोजन करण्यामागचा हेतू प्रास्ताविकामधून प्राचार्य डॉ. अ. ह. वानखेडे यांनी सांगितला. संचालन प्रा. धनराज खानोरकर यांनी केले.दुसऱ्या सत्रामध्ये आदिवासी साहित्याच्या प्रेरणा, स्वरून आणि आव्हाने यावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. माधव सरकुंडे, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सौरभ सुमन, प्रभू राजगडकर उपस्थित होते. तिसऱ्या सत्रातील आदिवासी साहित्यातील ललित वाङमय या परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, सुप्रसिद्ध कवयित्री कुसूम अलाम यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली. संचालन प्रा. मोक्षदा मनोहर यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राममनोहन बोकारे, सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे होते. समारोपीय वृत्तांतामधून प्रा. डॉ. माहेश्वरी गावित यांनी उपस्थित प्रतिनिधींना उद्बोधित केले. संचालन प्रा. रमेश पारेलवार यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनिता वाळके यांनी मानले. चर्चासत्राचे आयोजन यशस्वी करण्यासाठी प्रा. कऱ्हाडे, कापगते, प्रा. बनकर, प्रा. हांडेकर, प्रा. ताजणे, प्रा.मासीरकर, प्रा. राजूरकर, प्रा. डोंगरवार, प्रा. मोरे, प्रा. चुदरी, प्रा. बुरांडे, प्रा. पडोळे, प्रा. गायकवाड, यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)