शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवादी पत्रकारिता काळाची गरज

By admin | Updated: January 11, 2017 00:42 IST

देशात पत्रकारावरील हल्ले वाढतच चालले असून भ्रष्टाचारी प्रवाहाला पायबंद घालण्यासाठी ध्येयवादी पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, ..

श्रीधर बल्की : मामूलवार, एकनाथराव साळवे यांचा सत्कारराजुरा : देशात पत्रकारावरील हल्ले वाढतच चालले असून भ्रष्टाचारी प्रवाहाला पायबंद घालण्यासाठी ध्येयवादी पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार श्रीधरराव बल्की यांनी केले. राजुरा तालुका पत्रकार संघ, राजुराच्या वतीने किसान भवन येथे आयोजित पत्रकार दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उद्घाटक पत्रकार सुनील देशपांडे म्हणाले, वृत्तपत्र सृष्टीतील बहुतांश पत्रकार आदर्श, कल्याणकारी व समाज हिताची विचारात्मक व सकारात्मक पत्रकारिता करणारे आहेत. पत्रकार दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.बी.यू. बोर्डेवार होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव डॉ. उमाकांत धोटे, कार्याध्यक्ष विनायक देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीन पुरस्कार देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा जेष्ठ पत्रकार सन्मान श्रीधर बल्की यांना देऊन गौरव करण्यात आला. स्व. राघवेंद्रराव देशकर ग्रामीण वार्ता पुरस्कार लोकमतचे वार्ताहर प्रकाश काळे, स्व. महियर गुंडेविया शहर वार्ता पुरस्कार पत्रकार मोहन शर्मा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, माजी आमदार अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक रमेश नळे, राधेश्याम अडानिया, उज्ज्वला जयपूरकर, दिलीप डेरकर, प्रिती रेकलवार, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ.सुरेश उपगन्लावार, माजी नगरसेवक प्रा.अनिल ठाकुरवार, डॉ. भुपाळ पिंपळशेंडे, आनंद भेंडी उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे सचिव अनिल बाळ सराफ यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आनंद चलाख यांनी केले. आभार बादल बेले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)