शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना, जिवती तालुक्यातील ‘त्या’ स्थळांना विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:00 IST

कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम धरण, घाटराई देवस्थान, सावलहिरा येथील भिमलकुंड धबधबा, भस्म नागाची खोरी व धबधबे,  जांभूळधरा येथे सात धबधबे, उमरहिरा येथे दोन धबधबे, मेहंदी येथे बोदबोदी धबधबा, जेवरा येथे खडक्या धबधबा, टांगळा धबधबा, घाटराई धबधबा आदी तर जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला, सिंगारपठार धबधबा, चिखली धबधबा, नदप्पा धबधबा आदी पर्यटन स्थळे आहे. यातील मानिकगड किल्ला, पकडीगुद्दम धरण यांना पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : निसर्ग संपन्न असलेल्या कोरपना व जिवती तालुक्यातील अनेक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकासापासून अद्यापही वंचितच आहे. त्यामुळे दोन्ही तालुके पर्यटन तालुके म्हणून घोषित करून पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.एकीकडे माणिकगडचे उंच उंच पहाड तर दुसरीकडे वैनगंगा, वर्धा नदीचे निर्मल सान्निध्य लाभलेल्या या परिसरात पावसाळी पर्यटनासाठी सर्वदूर परिचित आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम धरण, घाटराई देवस्थान, सावलहिरा येथील भिमलकुंड धबधबा, भस्म नागाची खोरी व धबधबे,  जांभूळधरा येथे सात धबधबे, उमरहिरा येथे दोन धबधबे, मेहंदी येथे बोदबोदी धबधबा, जेवरा येथे खडक्या धबधबा, टांगळा धबधबा, घाटराई धबधबा आदी तर जिवती तालुक्यात माणिकगड किल्ला, सिंगारपठार धबधबा, चिखली धबधबा, नदप्पा धबधबा आदी पर्यटन स्थळे आहे. यातील मानिकगड किल्ला, पकडीगुद्दम धरण यांना पर्यटन स्थळाचा दर्जाही मिळाला आहे. मात्र, माणिकगड किल्ला वगळता एकाही स्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाला नाही.यामध्ये वनसडी, पारडी येथील निजाम कालीन इन्स्पेक्शन बंगले, कोळशी बु. येथील निजामकालीन नाका, शेरज बु. येथील पोलीस ठाण्याची वास्तू, रूपापेठ, दुर्गाडी, चनई येथील गोंडकालीन गढी, कारवाही येथील गुफा, शंकरलोधी येथील गुफा आदी स्थळेही पर्यटनासाठी चांगली आहेत.  

स्थानिकांना रोजगार तर वनविभागाला मिळणार उत्पन्नत्यामुळे ही स्थळे अनेक सोयी-सुविधापासून वंचित आहे. यातील बरचशी स्थळे वन क्षेत्रात आहे. त्यामुळे या स्थानी इको टुरिझमला वाव आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व वन विभागाला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. या दृष्टीने येथे विकास करणे गरजेचे आहे. परंतु यासंदर्भात कुठलीच पावले उचलली जात नाही. दोन्ही तालुक्यांत अनेक पुरातन वास्तू व वारसे आहे. त्याच्याही जतन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. काहींची तर साधी पुरातत्त्व विभागाच्या दप्तरी नोंदसुद्धा नाही. आता याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :tourismपर्यटन