शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात दादासाहेबांच्या विचारांची गरज- ठाकरे

By admin | Updated: September 24, 2015 01:07 IST

माजी मंत्री लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या तालमीत तयार झाले होते.

वरोऱ्यात कार्यक्रम : शब्दसुमनांनी दिली आदरांजलीवरोरा : माजी मंत्री लोकनेते स्व. दादासाहेब देवतळे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या तालमीत तयार झाले होते. त्यांच्यावर सर्वोदयी विचारांचा मोठा प्रभाव होता. निर्गवी, निस्वार्थी व लोकांमध्ये मिसळून लोकांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी व त्यांच्या विचारांची राजकारणात आजही गरज आहे, असे प्रतिपादन यवतमाळचे माजी खासदार सदाशिव ठाकरे यांनी केले.मंगळवारी आयोजित स्व. देवतळे यांच्या २९ व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे म्हणाले, स्व. दादासाहेब देवतळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा पुत्र डॉ. विजय यांनी पुढे चालवावा, याबाबत आपण स्वत: दादासाहेब यांच्या पत्नीशी चर्चा केली होती. परंतु पुतणे संजय देवतळे यांची स्वत: राजकारणात येण्याची इच्छा लक्षात घेऊन त्यांनी स्वत:च्या पुत्राऐवजी संजय देवतळे यांच्यासाठी होकार दिला होता. त्यामुळे त्यावेळी डॉ. विजय देवतळे यांचा राजकारणातील प्रवेश थांबला होता, असा खुलासा त्यांनी याप्रसंगी केला.वरोरा नगरपरिषदेच्या अध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात माजी खासदार नरेश पुगलिया, स्व. दादासाहेब देवतळे मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, वरोरा पंचायत समितीचे सभापती सुनंदा जीवतोडे, उपसभापती गजानन चांदेकर, आडकुजी पाटील नन्नावरे, रवींद्र शिंदे, डॉ. सुरेश महाकुलकर, अशोक नागपुरे, प्राध्यापक भोंग, लक्ष्मण गमे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया यांनीही स्व. देवतळे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक डॉ. विजय देवतळे यांनी केले. स्व. दादासाहेब देवतळे मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे आयोजित आशिर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील कामगिरीबाबत अ‍ॅड. जयवंत काकडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक हरिचंद्र ढोबळे व प्रगतशिल शेतकरी मधुकर भलमे या तीन पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पुष्पहाराने पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष विलास टिपले, नगरसेवक छोटुभाई शेख, रंजना पुरी, दर्शना मडावी, कन्हैयालाल जैस्वाल, पुरुषोत्तम निखाडे, साहेबराव ठाकरे, अनिल चौधरी, आसिफ रजा, गोठीजी, सोमदेव कोहाड, कापकर याप्रसंगी उपस्थित होते. संचालन प्रा. प्रशांत खुळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)