शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

गरज देशात, कोटींची घोषणा नेपाळात

By admin | Updated: August 4, 2014 23:38 IST

देशातील विकासासाठी निधीची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये १० हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या मागास भागात किंवा

अजित पवारांची मोदींवर टीका : चंद्रपुरातील राकाँचा मेळावाचंद्रपूर : देशातील विकासासाठी निधीची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये १० हजार कोटी रूपये देण्याची घोषणा करत आहेत. चंद्रपूर-गडचिरोलीसारख्या मागास भागात किंवा जम्मू-काश्मिरात मदतीची गरज असताना ही मदत नेपाळमध्ये दिली जावी, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी चंद्रपुरातील पक्षाच्या निर्धार मेळाव्यात उपस्थित केला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. गृहनिर्माण व पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहीर प्रमुख्याने उपस्थित होते. यावेळी मोदींना टीकेचे लक्ष्य करून अजित पवार म्हणाले, देशाच्या संसदेचे सत्र सुरू असताना पंतप्रधान मात्र विदेश दौऱ्यावर आहेत. देशात अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या त्यांच्या सरकारने अगदी महिनाभरात सर्वसामान्यांच्या रेल्वेचे भाडे वाढविले. महाराष्ट्रासारख्या राज्याचे बजेट ४५ हजार कोटींचे असताना एकट्या गुजरातसाठी त्यांनी आवश्यकता नसतानाही ६० हजार कोटींच्या बुलेट ट्रेनला मंजुरी दिली. ते पुढे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपावर काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. सन्मानजक जागावाटप झाले तर ठिक नाही तर मैदान आपलेच आहे. जागावाटप करताना स्थानिक स्वराज्य संस्थेतील संख्याबळाचा विचार व्हावा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपात काँग्रेसला २७ तर राष्ट्रवादीला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यात त्यांनी दोन तर, आम्ही चार जिंकल्या. याचाही विचार व्हायला हवा. राज्य सरकारमधील सत्तापक्ष या नात्याने केलेल्या विकासाचा आणि सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी भरीव अर्थसहाय्य जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून ुदिल्याचा दावाही त्यांनी केला.राकाँचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे यांनी गेल्या ३० वर्षातील राजकीय स्थितीचा आढावा भाषणातून घेतला. कृषी मंत्रीपदाच्या काळात शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख केला. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेससोबत गेल्या निवडणुकीत मैत्री केली होती. या वेळीही त्यासाठीच मैत्रीचा हात पुढे केला असला तरी आमचा स्वाभिमान कायम आहे. जागावाटपात अधिक जागा मिळाल्या पाहिजे, असे ते म्हणाले.ना. सचिन अहीर म्हणाले, राष्ट्रवादीने समाजातील सर्व घटाकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत पराभव झाला असला तरी विधानसभेतील यशासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील मनपा चालविता येत नाही ते महाराष्ट्र कसा काय चालविणार, अशी कोपरखळीही त्यांनी शिवसेनेला मारली. महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब साळुंंखे यांचीही भाषणे झालीत. मंचावर अ‍ॅड. एकनाथराव साळवे, अ‍ॅड. बाबा वासाडे, मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. गोंिवंद भेंडारकर, शोभाताई पोटदुखे, सुदर्शन निमकर, अमर बोडलावार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)