शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना तालुुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेज बंधाऱ्याची गरज

By admin | Updated: November 18, 2014 22:53 IST

शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे.

वनसडी : शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या ‘निम्म पैनगंगा प्रकल्पाचे काम मार्गी लागले आहे. महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असलेला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा हेतू साध्य ठरण्यासाठी कोरपना तालुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेज बंधारे बांधण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कोरपना तालुक्यातील परसोडा व चंद्रपूर तालुक्यातील वढा गावाजवळ बॅरेज बंधारे बांधण्यात आल्यास याचा उपयोग येथील शेतकऱ्यांना होणार आहे. दोन दिवसांपूर्वी तेलंगणातील जैनथ मंडलच्या ‘गिम्मा’ गावात तेथील प्रशासनाने बैठक घेऊन बॅरेज बंधाऱ्यासाठी शेतकऱ्यांची अनुमती मिळविली. तेथील शेतकरी यासाठी सकारात्मक आहे. हा भाग कोरपना तालुक्याला लागून आहे. पैनगंगा नदीदेखील तेथूनच वाहते. पुढे ती कोरपना तालुक्यात प्रवाहीत होते. पाण्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून या भागातही बॅरेज बंधारे बांधण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. या भागात या दृष्टीने सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. मात्र या निर्मिती संदर्भात कोणत्याच सरकारकडून हालचाली होत नसल्याने काम रखडले आहे. या क्षेत्रातील कोरपना, राजुरा, वणी, चंद्रपूर, झरी तालुक्याअंतर्गत गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तालुक्यातील ४० हजारापर्यंतचे धारणा क्षेत्र ओलीताखाली येऊ शकेल. याचा सर्वस्वी लाभ शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा होईल. सध्या केंद्रात व राज्यात एकच शासन असल्याने मंजुरी मिळण्यास कुठलीच अडचण जाणार नाही. या दृष्टिकोनातून शासनस्तरावर गतीमान हालचाली होणे गरजेचे आहे. यासाठी सिंचन विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या प्रचंड इच्छाशक्तीची गरज आहे. येथे त्वरित बॅरेज बंधाऱ्याविषयीच्या निर्मितीसाठी पाऊले उचलण्यात यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)