शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गडमौशी तलावाच्या नहराची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:06 IST

सिंदेवाही परिसरातील गडमौशी तलावाचा मुख्य नहर विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तक्रार करूनही पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देसिंदेवाही पाटबंधारे उपविभाग : सिंचन क्षमतेत घट

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही परिसरातील गडमौशी तलावाचा मुख्य नहर विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. तक्रार करूनही पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने व्यापारी व शेतकरी त्रस्त झाले आहेत.घोडाझरी सिंचन उपविभागअंतर्गत गडमौशी तलाव आहे. ब्रिटीशकालीन असलेल्या या तलावाचा मुख्य नहर लोनवाही मार्गे शिवाजी चौक, जुना बसस्थानक ते इंदिरा नगरकडे गेला आहे. या तलावाअंतर्गत २५० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आहे. नहराची लांबी ५ किलोमीटर आहे. शिवाजी चौक ते जुना बसस्थानकपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने, खाजगी रुग्णालय, स्टेट बँक व विविध प्रकारची दुकाने आहेत. नहरावरील अतिक्रमण हटविण्याकरिता पाटबंधारे उपविभागाने व्यापाºयांनी नहरावर बांधलेले पूल जेसीबीने तोडून टाकले. त्यामुळे नहर ठिकठिकाणी फुटला व अनेक ठिकाणी बुजलाही आहे.नहर जीर्ण झाल्यामुळे नहराची स्थिती अतिशय दयनीय आहे. त्यामुळे नहराची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी व शेतकरी पाणी वापर संस्थेने केली. मात्र या मागणीकडे संबधीत विभागाने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. वीस वर्षांपासून या नहराची दुरुस्ती करण्यात आली नाही. शेतजमिनीला सिंचनाची सोय व्हावी, यासाठी ब्रिटीश काळात गडमौशी तलावाची निर्मिती करण्यात आली होती.या नहरामुळे लोनवाही, सिंदेवाही व इंदिरा नगर परिसरातील शेतजमिनीला पाणी पुरवठा होतो. मात्र योग्य नियोजनाअभावी या नहराची दुर्दशा झाली आहे. सदर नहराचे सिमेंट क्रॉकीट लाईनिंगचे काम झालेले नाही. त्यामुळे नहर बुजले असून काही ठिकाणी पाणी साचून राहते. जुना बसस्थानकाजवळ नहर पुर्णपणे बुजलेला आहे. त्यामुळे नहर सिमेंट काँक्रीटने बांधणे आवश्यक आहे. नहराला लागून व्यापारी प्रतिष्ठाने असल्यामुळे नागरिकांना सध्या लोखंडी खांबावरून ये-जा करावे लागत आहे. त्यामुळे नहर दुरुस्तीची मागणी आहे.गडमौशी तलावाचे नहर पाणी वापर संस्था सिंदेवाहीला हस्तांतरीत करण्यात आले आहे. नहराचे लाईनिंग, काँक्रीटचे काम करावे, अशी मागणी संस्थेने पाटबंधारे उपविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.- मनोहर पवार, सचिवशेतकरी पाणी वापर संस्था, सिंदेवाही.नहराची किरकोळ दुरूस्ती पाणी वापर संस्थेकडे आहे. दुरूस्ती व बांधकामाचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे.-अतुल धोतरे, उपअभियंता, सिंदेवाही