शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव-सिंदेवाही मार्ग देतोय अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:10 IST

नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : नवरगाव-सिंदेवाही मार्गाचे रुंदीकरण करुन डागडुजी करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच या रस्त्याच्या बाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने समोरासमोर वाहने आल्यास वाहन काढताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.सदर मार्ग सिंदेवाही नवरगाव- चिमूर व वरोरा जोडणारा आहे. नवरगाव-सिंदेवाही मार्ग अरूंद असल्याने एकेरी वाहतूक सुरू असते. मात्र समोरून दुसरे चारचाकी वाहन आल्यास दोन्ही वाहनांचे एक चाक रोडच्या खाली उतरवावे लागते. रोडच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात उतार आहे. त्यामुळे याठिकाणी मुरूम टाकणे गरजेचे असताना माती टाकण्यात आली आहे. परिणामी मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे त्याठिकाणी मोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.तसेच नवरगाव अंतरगाव मार्गाचीसुद्धा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे दोन चारचाकी वाहन आल्यास इतर चालकांना आपले वाहन रस्त्याच्या कडेवर उतरवावे लागते. मात्र रस्त्याची चढाई जात असल्याने वाहन उतरविण्यास अडचण जात आहे. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संंबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.अनेकांनी गमावले प्राणनवरगांव-सिंदेवाही मार्गावर आजपर्यंत आठ ते दहा अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांचा जीव गेला तर अनेकांना कायमचे अंपगत्व आले आहे. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी रस्त्याची डागडूजी करुन रुंदीकरण करण्याची मागणी आहे.