शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘१०८’ रुग्णांसाठी नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 22:44 IST

रुग्णांना तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षांत ९५ हजार ६२४ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे.

ठळक मुद्देग्रामीण रुग्णांना दिलासा : विविध आजाराच्या ९५ हजार रुग्णांना दिले जीवनदान

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रुग्णांना तत्काळ रुग्णालयात नेण्याच्या उद्देशाने शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका सुरु केली. या रुग्णवाहिकेने मागील चार वर्षांत ९५ हजार ६२४ रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे.रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोय अभियानांतर्गत १०८ क्रमांकाची रुग्णावाहिका नागरिकांच्या सेवेत आणली. ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरित जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली आहे. मागील चार वर्र्षींच्या आकडेवारी लक्षात घेतल्यास ही रुग्णवाहिका रुग्णांना नवसंजीवनी देत असल्याचे सिद्ध होत आहे. सन २०१४ पासून या रुग्णवाहिकेने ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ९५ हजार ६२४ रुग्णांना जीवदान दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सर्व सोईसुविधा उपलब्ध असलेल्या २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये विभागीय व्यवस्थापक डॉ. घाटे यांच्या नेतृत्वात जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे यांच्या नेतृत्वात रुग्णवाहिकेवर ५२ चालक, ४१ डॉक्टर सेवा देत आहेत. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी फोन करुन माहिती दिल्यास सदर रुग्णवाहिका त्वरित त्या घटनास्थळावर जाऊन त्याला रुग्णालयात हजर करते. तसेच रुग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध असल्यास ते रुग्णांवर प्राथमिक उपचार करीत असल्याने रुग्णालयात जातपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.रुग्णाच्या कुटुंबीयांकडून फोन आल्यानंतर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका त्वरित त्याठिकाणी पाठविली जाते. तसेच रुग्णवाहिकेतील डॉक्टरही त्या रुग्णावर उपचार करीत असतात. त्यामुळे रुग्णाला सुरळीत रुग्णालयात पोहचविण्यात यश येत आहे. आमच्याकडील सर्व रुग्णवाहिका सर्व सुविधायुक्त व सुस्थितीत असून रुग्णांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत.-डॉ.चेतन कोरडे, जिल्हा व्यवस्थापक