शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

हजारो हेक्टर शेतीवर निसर्गाची वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:03 IST

शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिके करपली : पाऊस झाला बेपत्ता

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवतीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. पावसमाुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असतानाच ऐन वेळी पावसाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिली आहे. सध्या पिकांच्या फळधारणेचा काळ आहे. परंतु गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने पिकांना मोठा फटका बसला असून कापसाचे पीक करपायला लागले आहे. विदर्भ प्रांत कापूस पिकांसाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस शेतकºयांचे नगदी पीक आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून बहुतांश शेतकºयांनी शेती केली आहे. परंतु निसर्गाने ऐनवेळी खरिपाच्या पिकांना दगा दिला आहे. कपासीवर यावर्षी बोंडअळीचे सावट घोंगावत असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने फळधारणेवर आलेली पिके करपायला लागली आहे. यावर्षी कपाशीला विविध रोगांनी ग्रासल्याने शेतकºयांनी पिकावर अतोनात खर्च केला आहे. मात्र परतीचा पाऊसही अचानक बेपत्ता झाल्याने खरिपातील पिकांचे आता कसे होणार, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. जमिनीतील ओलावा आटून गेल्याने जमिनीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. आज उद्या पाऊस येईल, या आशेवर शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु पाऊस येण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. पाऊस आला नाही तर यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एकूणच शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे.एका बॅगला तीन पोते सोयाबीनची उतारीसोयाबीनचा दाना भरण्यासाठी पावसाची गरज आहे. मात्र पाऊस आला नाही. त्यामुळे सोयाबीनचा दाना भरला नाही. पोकळ शेंगा लागल्या. शेतकºयांनी सोयाबीनवर खर्च केला. आता सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून एका बॅगला तीन पोते सोयाबीन उतारी मिळत असल्याने केलेला खर्च निघणार कसा, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.पावसाअभावी शेतातील पिके वाळायला लागली आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट होणर असून शेतीवर केलेला खर्च भरुन निघेल की नाही, याची हमी शेतकऱ्यांजवळ नसल्याने शेतकरी आताच हतबल झाला आहे.-गणेश पाटील, शेतकरी भोयेगाव