शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाचा लहरीपणा अन् शासनाची उदासीनता

By admin | Updated: September 11, 2015 01:20 IST

शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

कष्टकऱ्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा : शेतकऱ्यांचा जीव टांगणीला गोवरी : शेतकऱ्यांची शेती दिवसेंदिवस बेभरवशाची होत चालली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. मागील वर्षीच्या तुलनेतत यावर्षी चांगला पाऊस येईल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तविले होते. हंगामाच्या सुरवातीला दोन दिवस चांगला पाऊस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे निसर्गाची अवकृपा आणि शासनाची उदासिनता शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.आज, उद्या पाऊस येईल, या आशेवर बळीराजा असताना ऐनवेळी पावसाने हुलकावणी दिली. जमिनीत टाकलेले महागडे बियाणे अंकुरण्यापूर्वीच जमिनीत करपूण गेले. पै पै जुळवून उभी केलेली तुटपूंजी मिळकत शेतीवर खर्च झाली. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाने दगा दिल्याने उसनवारी करुन आणलेल्या कर्जाचा डोंगर पुन्हा वाढला आहे. वर्षभराचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांचा वार्षिक बजेट कोलमडला आहे. शेतीत दिवस-रात्र मेहनत करुन शेवटी हातात काहीच येत नाही. त्यामुळे शेतकरी मनातून पार खचून गेला आहे. मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च, वाढत जाणारा कर्जाचा डोंगर आणि संसाराचा भार पेलताना शेतकऱ्यांची शक्ती दु:ख सहन करण्यापलीकडची झाली आहे.शेतीला दिवसेंदिवस येत असलेली अवकळा कायम असल्याने उत्तम शेती म्हणायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पिकांच्या फळधारणेसाठी सध्या पावसाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या वाढीसाठी महागडे रासायनिक खते दिले. मात्र सप्टेंबर महिन्यातच पाऊस गायब झाल्याचे चित्र दिसत असल्याने पुन्हा दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा जात असल्याने त्याचा फटका शेतपिकांना बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागते. सध्या शेतपिकांच्या वाढीचा व फळधारणेचा काळ आहे. शेतपिकांवर अज्ञात रोगाने अतीक्रमण केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेती जंगल परिसरात असल्याने उभ्या पिकांत जंगली जनावरांचा धुमाकूळ सुरु आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत भरदिवसा उभे पीक उपटून मोठ्या प्रमाणात शेतपिकांची नासधूस सुरु आहे. मात्र त्यावर आळा घालणारी यंत्रणा शेतकऱ्यांकडे नसल्याने शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून जागल करावी लागत आहे. शेतकऱ्यांविषयी शासकीय यंत्रणाच पांगळी झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेती पिकवूनही घामाचे दाम मिळत नसेल तर वर्षभर होत असलेली ससेहोलपट काय कामाची, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. (वार्ताहर)