राजोली : महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्याच्या सीमालगत वसलेल्या सोमनूर आणि कालेश्वर या प्रसिद्ध पौराणिक व निसर्गरम्य स्थळांना भेटी देवून येथील सखींनी आयोजित निसर्ग अभ्यास दौरा नुकताच पूर्ण केला. यावेळी कालेश्वर येथे मोठा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. पौराणिक हेमाडपंथी एकाच मंदिरात कालेश्वर या नावाने प्रसिद्ध असलेली दोन ज्योतीर्लिंग स्थापित असल्याने त्याचे आगळेच महत्व आहे. गोदावरी, प्राणहिता आणि गुप्त सरस्वती या नद्यांच्या संगमावर हे शिवालय वसले आहे. सखींनी या पौराणिक निसर्गरम्य, शांत, आध्यात्मिक परिसराचा आनंद घेऊन सोमनूर येथील निसर्गाची भुरळ पाडणारी विविधता दूरवर पसरलेली घनदाट हिरवी वनराई, मध्येच उमटून दिसणारी पर्वतराजी, त्याच्या पायथ्याशी वाहणारी जीवनदायनी आणि तिच्या पाण्यावर फुलणारे शेतशिवारे व जनजीवन ही निसर्गाची विविध रूपे येथील सखींनी या अभ्यास दौऱ्यात अनुभवली.अर्चना गंटलेवार, रजनी सागुळले, आशाताई बोरकर, सरस्वती भंडारी, ज्योती सिडाम, माया जक्कुलवार, विजया जक्कुलवार, कविता वासेकर, सोनाली पोरेड्डीवार, मंदाताई मुनगंटीवार, ज्योती घायवट, हिना पठाण, तेजस्विनी घायवट यांच्या मार्गदर्शनात सुमारे पन्नासावर सखींनी या दौऱ्यात भाग घेतला होता. (वार्ताहर)
सखींनी अनुभवली निसर्गाची विविध रुपे
By admin | Updated: March 24, 2017 00:51 IST