आॅनलाईन लोकमतचंद्र्रपूर : चिमण्या जगल्या तरच निसर्गातील जैवविविधता टिकेल, हा विचार पटवून देण्यासाठी जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांना सहजपणे पाणी मिळावे, म्हणून इको-प्रोच्या वतीने पक्ष्यांकरिता चंद्रपुरातील हिंग्लाज भवानी वॉर्डातील नागरिकांच्या घरोघरी जावून जलपात्र वाटप करण्याचा उपक्रम सोमवारपासून सुरू करण्यात आला.इको-प्रो संस्थेच्या वतीने ‘मिशन सेव्ह बर्ड’ अभियानअंतर्गत दरवर्षी पक्ष्यांकरिता जलपात्र वाटप केले जाते. हिंग्लाज भवानी परिसरात विविध प्रकारचे पक्षी व चिमण्यांचा वावर मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांशी संवाद साधून पक्षी संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी यावर्षीदेखील हा उपक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनीही उपक्रमाचे स्वागत करून पक्षी संरक्षणासाठी हातभार लावण्याचे मान्य केले. वनाचे क्षेत्र कमी होत आहे. शहरात वृक्षांची संख्या घटली असून सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. परिणामी, चिमण्यांचा चिवचिवाट बंद झाला. विविध प्रजातींची पक्षी झपाट्याने कमी होत आहे. पाण्यावाचून अनेक पक्ष्यांचा जीव जातो. जंगलासह पाणवठे कोरडे पडत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागेल. हिंग्लाज भवानी वॉर्डातील राजु जंगम, सुनील गेडाम, स्नेहदीप बालगृह, ज्योती काटगुलवार, राकेश गेडाम, महादेव त्रिशुलवार, मनोज वाघमारे, वनीता वाघमारे, उमेश सातर्डे, आशा रायपुरे, महादेव टेकाम, आत्माराम मडावी, अनिल पिपंळकर, सुनंदा बावणे, नितेश गेडाम, सुनील ढेकले, किसन मानकर, आंबेडकर नगर, सुनील पिंपळकर, राजेंद्र मडावी, रामनारायण पांडे, चंदू राऊत, सुभाष नवघरे, संतोष शेंडे यांच्या घरी जलपात्र बांधून अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी इको-प्रोच्या पक्षी संरक्षण विभागाचे उपप्रमुख हरिश मेश्राम, सदस्य अमोल उट्टलवार रोशन धोतरे, धर्मेंद्र लुनावत, सुनील लिपटे, वैभव मडावी, अतुल रांखुडे, सन्नी मेश्राम, सुनील पाटील आदी सहभागी झाले होते.
चिमण्या जगल्या तरच निसर्ग टिकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:03 IST
चिमण्या जगल्या तरच निसर्गातील जैवविविधता टिकेल, हा विचार पटवून देण्यासाठी जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांना सहजपणे पाणी मिळावे, म्हणून इको-प्रोच्या वतीने पक्ष्यांकरिता चंद्रपुरातील हिंग्लाज भवानी वॉर्डातील नागरिकांच्या घरोघरी जावून जलपात्र वाटप करण्याचा उपक्रम सोमवारपासून सुरू करण्यात आला.
चिमण्या जगल्या तरच निसर्ग टिकेल
ठळक मुद्देइको-प्रो : हिंग्लाज भवानी वॉर्डातील नागरिकांना जलपात्र वाटप