फोटो
बल्लारपूर : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यशाळा पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या कार्यशाळेत जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे डॉ. आकाश कासावार, दंतचिकित्सक,डॉ. श्वेता सावलीकर, समुपदेशक मित्रंजय निरांजने, तुषार रायपुरे यांनी कार्यशाळेत सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगितले व त्यामुळे तोंडाचा कॅन्सरचा आजार, कॅन्सरची प्राथमिकता, तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे व तंबाखू व्यसन सोडण्यासाठी उपाययोजना या विषयावर उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस खात्यातील चार अधिकारी व ५० कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित डॉक्टर मंडळींचे ठाणेदार उमेश पाटील यांनी आभार मानले.