चंद्रपूर : भारतीय जैन संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल्ल पारख हे ‘परिवर्तन यात्राा नई पीढी नई सोच’ या कार्यक्रमांतर्गत २२ जून रोजी चंद्रपूर येथे येत आहेत. स्थानीय जैन भवनात आयोजित मेळाव्यात ते मार्र्गदर्शन करतील. सकाळी १० वाजता प्रथम सत्र व दुपारी १ वाजता द्वितीय सत्र असे कार्यक्रम होणार आहे.पारख हे ३१ मार्चपासून ७ सप्टेंबर पर्यंत भारत दौऱ्यावर आहेत. संपूर्ण देशात ते अनेक राज्य व शहरामध्ये सभा व मेळावे घेत आहेत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात चंद्रपूरपासून सुरू होत असून ३० जून रोेजी बारामती येथे समाप्त होईल. महाराष्ट्रात या दरम्यान ते २१ ठिकाणी भेटी देणार आहेत.जैन समाजाला अल्पसंख्यकाचा दर्जा मिळाल्यापासून व राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांंचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमामध्ये ते युवक, व्यावसायी, महिला, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आदींशी संंवाद साधणार आहेत.नवीन युगामध्ये लहान मुलांच्या बौद्धीक क्षमतेच्या आधारावर शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी, नविन युगामध्ये पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव व त्याच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईशी आपल्या समाजाचा व्यवहार व समाजापासून त्यांंच्या अपेक्षा, हमारी चिंता- उनका भविष्य, हमारी अपेक्षाए- उनका स्वतंत्र, यावर चर्चा होईल. या बदलत्या काळात पारंपरिक व्यवसायातून नष्ट होत चाललेली तरुण पिढी, जुन्या व्यवसायांचे भविष्य, मॉल संस्कृतीचा प्रभाव, नवीन पीढीच्या तरुणांच्या कार्यक्षमतेचा उपयोग यावरही ते चर्चा करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा सकल जैन समाजाचे अध्यक्ष नरेश पुगलिया राहतील. यावेळी परिवर्तन यात्रेचे राष्ट्रीय संयोजक महेश कोठारी, राज्य अध्यक्ष पारस ओसवाल, रमेश कोचर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. (नगर प्रतिनिधी)
जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पारख उद्या चंद्रपुरात
By admin | Published: June 21, 2014 1:28 AM