शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महाअधिवेशन नागपुरात

By admin | Updated: July 26, 2016 01:09 IST

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ आॅगस्ट रोजी नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात एक दिवसीय ओबीसी महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

७ आॅगस्ट : निवृत्त न्या. बी.जी. कोळसे पाटील उद्घाटन करणारचंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ आॅगस्ट रोजी नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात एक दिवसीय ओबीसी महाधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्घाटन सकाळी १० वाजता निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे राहणार असून अध्यक्षस्थानी प्रा. या. वा. वडस्कर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, नागपूरचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, माजी राज्यमंत्री व विधानसभेचे काँग्रेस उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, खा. रामदास तडस, खा. नाना पटोले, खा. राजीव सातव, आ. सुनील केदार, आ. रवी राणा, माजी आमदार पांडुरंग ढोले व सेवक वाघाये उपस्थित राहतील.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आॅल इंडिया फेडरेशन आॅफ एम्प्लाईज असोसिएशनचे (चेन्नई) महासचिव जी. करुणानिधी राहणार असून राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री ना. महादेवराव जानकर, आ. जितेंद्र आव्हाड, आ. बच्चू कडू, आ. विजयराव रहागंडाले, आ. बाळू धानोरकर, बबनराव फंड, एस.एल. आक्कीसागर, जयंत लुटे, प्रा. रमेश पिसे, परिणय फुके उपस्थित राहतील. यावेळी बहुजन-ओबीसी चळवळीत आपले योगदान देणारे बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, प्रा. मा. म. देशमुख व बबनराव फंड यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सकाळी ११.३० वाजता ओबीसी शिष्यवृत्ती व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर व यशदाचे राष्ट्रीय प्रशिक्षक अ‍ॅड. गणेश हलकारे हे प्रमुख वक्ते असून प्रा. जैमिनी कडू अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. आर.जी. टाले, महात्मा फुले समता परिषदेचे विदर्भ संघटक प्रा. दिवाकर गमे, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष प्रा. अशोक चोपडे, प्रा. अरुण पवार, दिनेश चोखारे, नितीन मते, रविकांत बोपचे, सलील देशमुख, डॉ. राजेश ठाकरे, भूषण दडवे आदी उपस्थित राहणार आहेत.दुपारी २.३० वाजता आयोजित ओबीसी शेतकऱ्यांची समस्या व उपाय या विषयावरील दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे मार्गदर्शन करतील. गोंदिया ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे हे अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी अरुण पाटील मुनघाटे, रमेश मडावी, बबनराव नाखले, अविनाश काकडे, प्रा. देवानंद कामडी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार.सायंकाळी ४.३० वाजेच्या तृतीय सत्रामध्ये ओबीसी महिला व सामाजिक परिवर्तन या विषयावर बीडच्या सुशीलाताई मोराळे व नागपूरच्या नंदाताई फुकट मार्गदर्शन करतील. तर अध्यक्षस्थानी प्रा. नूतन माळवी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य विद्या तट्टे, शुभांगी घाटोळे, यामिनी चौधरी, अ‍ॅड. रेखा बारहाते उपस्थित राहतील. सायंकाळी ५.३० वाजता समारोपीय कार्यक्रमाचे वक्ते म्हणून बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी व राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी मार्गदर्शन करतील. (प्रतिनिधी)