यावेळी महासचिव सचिन राजूरकर, राज्यध्यक्ष श्यामभाऊ लेडे, कल्पना मानकर, योगिता लांडगे यांच्या उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ चिमूर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती लता पिसे, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य ममता डुकरे, तसेच पं.स. सदस्य भावना बावनकर, ज्योती ठाकरे, उषा हिवरकर, पुष्पा हरणे, माधुरी रेवतकर, सविता चौधरी, प्रज्वला गावंडे उपस्थित होत्या. कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष म्हणून पुष्पा हरणे यांची तर सचिवपदी माधुरी रेवतकर, कार्याध्यक्षपदी यमू कामडी, कोषाध्यक्ष शालू पिसे, सहसचिव मीनाक्षी बंडे, चिमूर शहर अध्यक्ष शृतिका बंडे, तालुका उपाध्यक्षपदी उज्ज्वला गावंडे, मनीषा ठोंबरे, शालिनी पिसे, माधुरी पंधरे, लता सातपुते, वैशाली शेंडे, कमला राऊत इत्यादी तर मार्गदर्शक म्हणून ममता डुकरे, लता पिसे, भावना बावनकर, उषा हिवरकर, वंदना कामडी, लता अगडे इत्यादींची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली. संचालन कवडू लोहकरे यांनी केले तर प्रास्ताविक रामदास कामडी यांनी केले. आभार वैशाली शेंडे यांनी मानले.