शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

एकवटलेले गाव झाले अनाथांसाठी नाथ

By admin | Updated: June 14, 2014 01:50 IST

तिच्या बालपणी कुटुंब सर्वसामान्यासारखे होते. पण समज आल्यानंतर नियतीचे चक्र फिरले.

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरतिच्या बालपणी कुटुंब सर्वसामान्यासारखे होते. पण समज आल्यानंतर नियतीचे चक्र फिरले. आई वेडी झाली. वडीलांचे छत्र आजारपणात हरपले. परिस्थिती दयनिय झाली. तशी तिला व भावंडांना वेगळी वागणूक मिळू लागली. अशातच आयुष्याच्या अंधारात चाचपडत असताना जोडीदार मिळाला. पण परिस्थिती आड येत होती. अखेर अनाथ मुलीच्या मदतीला माणुसकी धावली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरकरांनी सामाजिक बांधिलकी जोपासून लोकवर्गणीच्या माध्यमातून तिचा काल गुरुवारी थाटात विवाह लावून दिला. रंजना असे या अनाथ मुलीचे नाव. एकेकाळी रंजनाचे वडील पांडुरंग पुणेकर दुकान व्यावसायिक होते. आई सरिता शिक्षित होती. योगेश व दीपक दोन भावंडे होती. सुखी कुटुंब म्हणून संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. भावी सुखी व समाधानी जीवनाचे स्वप्न पाहत असलेल्या कुटुंबाला दृष्ट लागली. आई सरिताला आजारपणाने घेरले. यामुळे तिच्या वडीलांची अस्वस्थ राहू लागले.पत्नी सरिताच्या आजारपणावरील खर्च जसजसा वाढत गेला. तसतसा दुकान व्यवसाय डबघाईस येऊ लागला. परिणामी पत्नीचे आजारपण व तीन मुलांचा सांभाळ करतानाच एकेदिवशी पांडुरंग पुणेकर यांचे निधन झाले. कुटुंबाची सर्व जबाबदारी रंजना हिलाच पेलावी लागली. यासाठी तिला शिक्षणाकडे पाठ फिरवावी लागली. काही महिन्यातच पाठचा भाऊ योगेशवर काळाने झडप घातली. तेव्हापासून वेडसरपणात वावरणारी आई सरिता व मंदबुद्धीचा लहान भाऊ दीपक व अपंग विवेक यांचा सांभाळ रंजना आजतागयत हालअपेष्टा सहन करुन करीत आहे.दरम्यान आयुष्याच्या ओझ्याखाली जीवन जगत असताना विजय सोयाम नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर लग्नसंबंधात करण्याचे दोघांनी ठरविले. परंतु मार्ग सापडत नव्हता. हातात दमडीही नव्हती. अशातच अपंग असलेला पानटपरी चालक गणेश करमनकर यांना ही वार्ता कळली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले. गावकऱ्यांनी अनाथ मुलीच्या लग्नासाठी मदत द्या, अशा आशयाचे दोन फलक लावले. फलक पाहून सामाजिक जाणिवेतून काहींनी मदत दिली. चंद्रपूर येथील शरद राजने, पी.के. जैन, अ‍ॅड. प्रकाश गजबे, वसंत उपरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बाबन परसूटकर, मधुकर भोयर, शंकर तेलंग, शालीकराम भोजेकर, मीना सादराणी, अण्णा सुंदरगिरी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोती गावंडे, तुळशिराम गोरे, सुभाष हरणे, अरुण जगताप, वैभव मेशाम, फोटोग्राफर राजूसिंग, प्रभाकर टोंगे, मदन बुरचुंडे, दादाजी जीवने, ऋषी गिरडकर, शामराव देठे, परमेश्वर पुणेकर आदींंनी अनाथ रंजनाच्या लग्नासाठी मदतीचा हातभार लावला.