शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

एकवटलेले गाव झाले अनाथांसाठी नाथ

By admin | Updated: June 16, 2014 23:24 IST

तिच्या बालपणी कुटुंब सर्वसामान्यासारखे होते. पण समज आल्यानंतर नियतीचे चक्र फिरले. आई वेडी झाली. वडीलांचे छत्र आजारपणात हरपले. परिस्थिती दयनिय झाली. तशी तिला व भावंडांना वेगळी वागणूक मिळू लागली.

लोकवर्गणीतून लग्न : अनाथ मुलीच्या मदतीला धावली माणुसकीअनेकश्वर मेश्राम - बल्लारपूरतिच्या बालपणी कुटुंब सर्वसामान्यासारखे होते. पण समज आल्यानंतर नियतीचे चक्र फिरले. आई वेडी झाली. वडीलांचे छत्र आजारपणात हरपले. परिस्थिती दयनिय झाली. तशी तिला व भावंडांना वेगळी वागणूक मिळू लागली. अशातच आयुष्याच्या अंधारात चाचपडत असताना जोडीदार मिळाला. पण परिस्थिती आड येत होती. अखेर अनाथ मुलीच्या मदतीला माणुसकी धावली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरकरांनी सामाजिक बांधिलकी जोपासून लोकवर्गणीच्या माध्यमातून तिचा काल गुरुवारी थाटात विवाह लावून दिला. रंजना असे या अनाथ मुलीचे नाव. एकेकाळी रंजनाचे वडील पांडुरंग पुणेकर दुकान व्यावसायिक होते. आई सरिता शिक्षित होती. योगेश व दीपक दोन भावंडे होती. सुखी कुटुंब म्हणून संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. भावी सुखी व समाधानी जीवनाचे स्वप्न पाहत असलेल्या कुटुंबाला दृष्ट लागली. आई सरिताला आजारपणाने घेरले. यामुळे तिच्या वडीलांची अस्वस्थ राहू लागले.पत्नी सरिताच्या आजारपणावरील खर्च जसजसा वाढत गेला. तसतसा दुकान व्यवसाय डबघाईस येऊ लागला. परिणामी पत्नीचे आजारपण व तीन मुलांचा सांभाळ करतानाच एकेदिवशी पांडुरंग पुणेकर यांचे निधन झाले. कुटुंबाची सर्व जबाबदारी रंजना हिलाच पेलावी लागली. यासाठी तिला शिक्षणाकडे पाठ फिरवावी लागली. काही महिन्यातच पाठचा भाऊ योगेशवर काळाने झडप घातली. तेव्हापासून वेडसरपणात वावरणारी आई सरिता व मंदबुद्धीचा लहान भाऊ दीपक व अपंग विवेक यांचा सांभाळ रंजना आजतागयत हालअपेष्टा सहन करुन करीत आहे.दरम्यान आयुष्याच्या ओझ्याखाली जीवन जगत असताना विजय सोयाम नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर लग्नसंबंधात करण्याचे दोघांनी ठरविले. परंतु मार्ग सापडत नव्हता. हातात दमडीही नव्हती. अशातच अपंग असलेला पानटपरी चालक गणेश करमनकर यांना ही वार्ता कळली. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले. गावकऱ्यांनी अनाथ मुलीच्या लग्नासाठी मदत द्या, अशा आशयाचे दोन फलक लावले. फलक पाहून सामाजिक जाणिवेतून काहींनी मदत दिली. चंद्रपूर येथील शरद राजने, पी.के. जैन, अ‍ॅड. प्रकाश गजबे, वसंत उपरे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, बाबन परसूटकर, मधुकर भोयर, शंकर तेलंग, शालीकराम भोजेकर, मीना सादराणी, अण्णा सुंदरगिरी, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मारोती गावंडे, तुळशिराम गोरे, सुभाष हरणे, अरुण जगताप, वैभव मेशाम, फोटोग्राफर राजूसिंग, प्रभाकर टोंगे, मदन बुरचुंडे, दादाजी जीवने, ऋषी गिरडकर, शामराव देठे, परमेश्वर पुणेकर आदींंनी अनाथ रंजनाच्या लग्नासाठी मदतीचा हातभार लावला.