शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

अंमलनाला धरण पर्यटनाच्या दर्जापासून वंचित

By admin | Updated: May 22, 2015 01:20 IST

शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे.

गडचांदूर : शहराच्या दक्षिणेस उंच पहाड व हिरव्यागार रम्य परिसरात असलेले अंमलनाला धरण गडचांदूर तथा परिसरातील नागरिकांसाठी चौपाटी ठरले आहे. अनेक पर्यटकही या ठिकाणी भेटी देतात. मात्र हे स्थळ पर्यटनाच्या दर्जापासून वंचित असल्याने विकास थांबला आहे.पहाटे सकाळी व सायंकाळी नागरिकांची या ठिकाणी गर्दी असते. शासनाने या धरणाला पर्यटनाचा दर्जा देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी नागरिकांची मागणी आहे. अंमलनाला धरण निसर्गरम्य परिसरात आहे. या परिसरात पाऊल टाकताच मनाला प्रसन्न वाटते. या तलावाला तसेच जवळच असलेल्या प्राचीन माणिकगड किल्ला, विष्णु मंदिर, शंकरदेव मंदिर, माता मंदिरला दरवर्षी हजारो नागरिक भेटी देतात. पर्यटनक्षेत्र म्हणून या परिसराचा विकास झाला. पर्यटकाच्या संख्येत आणखी वाढ होईल. निसर्गाने विविध रंगाची उधळण केलेल्या व वनवैभवाने समृद्ध असलेल्या हिरव्यागार रम्य परिसरात अंमलनाला धरणाची निर्मिती १९८५ मध्ये झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. या प्रकल्पात २२.७० दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. जलाशयाचा उपयुक्त पाणीसाठा २१.२० दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पाची लांबी १६०८ मीटर, रूंदी ५५० मीटर, उंची २६.५७ मीटर आहे. जलाशयाची उपयोगिता लक्षात घेता या जलाशयाच्या सांडव्याची उंची एक मीटर वाढविण्याचे काम तीन वर्षापूर्वी झाले. या कामावर शासनाने दोन कोटी रुपये खर्च केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागात शेती व्यवसाय सुजलाम सुफलाम करण्याच्या उदात्त हेतूने या प्रकल्पाची निर्मिती झाली. मात्र येथील औद्योगिक कारखाने, सिमेंट उद्योग आडवे आले. याच धरणातून गडचांदूर शहराला पाणी पुरवठा करणारी योजना कार्यान्वित होणार असून या योजनेचे काम सुरू आहे. अंमलनाला जलाशय पूर्ण भरल्यानंतर सांडवा व प्रपातावरून वाहत असणाऱ्या पाण्याचे दृष्य विलोभनीय दिसते. पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अंमलनाला धरण एक सुंदर पर्यटनस्थळ बनू शकते. बोटींगची व्यवस्था केल्यास पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल. शासनाने या तलावाकडे केवल सिंचनची एक सोय या दृष्टीने न पाहता पर्यटनस्थळच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. शासनाने रिसोर्टच्या माध्यमातून बोटींग, बगिचा, रेस्टारंट केल्यास पर्यटकांना फायदेशीर ठरेल. (वार्ताहर)