शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पाच विधानसभा क्षेत्रात 68,934 मतदारांची नावे डिलीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 11:23 PM

चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा व चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारयादी अपडेट करण्याची मोहीम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार यादीतील ज्यांची नावे आहेत. मात्र, छायाचित्र सादर केले नाही, अशा मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पाचही विधानसभा मतदारसंघातून छायाचित्र नसलेले ७५  हजार ४५ मतदार आढळले.

ठळक मुद्देछायाचित्र दिलेच नाही : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक २९ हजार ९२३ नावे वगळली

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने अनेकदा मुदतवाढ देऊनही छायाचित्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रातील तब्बल ६८ हजार ९३४ मतदारांची नावे यादीतून डिलीट करण्यात आली आहेत.चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा व चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारयादी अपडेट करण्याची मोहीम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार यादीतील ज्यांची नावे आहेत. मात्र, छायाचित्र सादर केले नाही, अशा मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पाचही विधानसभा मतदारसंघातून छायाचित्र नसलेले ७५  हजार ४५ मतदार आढळले. यातील काहींचे निधन झाले तर अनेकांनी नोकरी, रोजगार अथवा व्यवसायासाठी स्थानांतरण केले. हयात असणाऱ्या मतदारांना छायाचित्र सादर करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. मतदारांकडून प्रतिसादच न मिळाल्याने पुन्हा शेवटची संधी म्हणून २४ जुलै २०२१ पर्यंतची डेडलाईन दिली होती. ६ हजार ६१ मतदारांनीच छायाचित्र सादर          केले. 

चंद्रपूर मनपा निवडणुकीचे समीकरण गडबडणार 

- जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील यादीच्या तुलनेत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या यादीतून वगळलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक २९ हजार ९२३ एवढी आहे. यातील बहुसंख्य मतदार प्रामुख्याने चंद्रपुरातील रहिवासी आहेत. 

- चंद्रपूर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हीच सुधारित मतदारयादी वापरण्यात येणार आहे. मतदारांची नावे अपडेट झाली नाही तर, मनपा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातही वगळलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. 

मतदारयादीत पुन्हा नाव येण्यासाठी... मतदारयादी अद्ययावत करताना निवडणूक आयोगाने छायाचित्र सादर करण्याची अट लागू केली. त्यानुसार छायाचित्र सादर केलेल्या चार मतदार संघातील ६ हजार ६१ मतदारांची नावे निवडणूक विभागाने अपलोड केली. ज्यांची नावे डिलीट झाली त्यांनी पुन्हा विहित प्रपत्रात अर्ज सादर केल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट केले जाईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगvidhan sabhaविधानसभा