शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दुकानांसमोर लावावा लागणार मराठीतून नामफलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.  मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक दुकान व आस्थापनांचे नामफलक आता मराठीतच ठेवणे अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा आदेश शुक्रवारी धडकला. या आदेशानुसार सहायक कामगार आयुक्तांनी यासंदर्भात नियमही जाहीर केले. दुकान व आस्थापना चालकांनी या नियमाचा भंग केल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. राज्यातील दुकान व आस्थापनांचे  नामफलक ठेवणे सक्तीचे केल्यानंतर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा झाली. या अधिनियमाच्या कलम ७ अन्वये ज्या आस्थापनेत १० पेक्षा कमी कामगार आहेत. कलम ३६ (क) (१) कलम ६ अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत १० पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील.  मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. 

अशा आहेत अटी - प्रत्येक दुकान किंवा आस्थापनेच्या नावाचा फलक मराठीत देवनागरी लिपीत आणि तीही अक्षरे सुरुवातीलाच असली पाहिजे. देवनागरी लिपीतला नावाचा फलक कमी उठावदार असणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे.   

‘त्या‘ दोन उल्लेखांना प्रतिबंध- ज्या आस्थापनेतून मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना व नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. असा बदल शासनाने १७ मार्च २०२२ रोजी या अधिनियमांतर्गत केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना मालकांनी तरतुदींचे  तंतोतंत पालन करावे. नियमाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करू, अशी माहिती आवाहन सहायक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी दिली.

सरकारचा निर्णय चांगला आहे. पण सक्ती करू नये, ती ऐच्छिक असावी. इंग्रजी वगळल्यास मराठी व हिंदी देवनागरी लिपीतच लिहिली जाते. नवीन नियमानुसार आता मराठी शब्द उठावदार राहील. आपण महाराष्ट्रात राहत असल्याने मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. यातून एकतेची भावना वाढेल. -सदानंद खत्री, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघ, चंद्रपूर

 

टॅग्स :marathiमराठी