शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नाव स्पेशालिटी, पार्किंगचा पत्ता नाही

By admin | Updated: January 17, 2015 22:54 IST

औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये किमान ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र यातील बहुतांश इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्थाच

चंद्रपूर : औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये किमान ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र यातील बहुतांश इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्थाच नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले. एवढेच नाही तर काही रुग्णालयात पार्किंग असतानाही तेथे वाहन लावण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तर काही रुग्णालयांमध्ये केवळ नावापुरतीच पार्किंग व्यवस्था करून खासगी डॉक्टरांनी मनपा प्रशासन तसेच नागरिकांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे.शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब आहे. असे असले तरी अनेक इमारतींमध्ये पार्किंग व्यवस्था नाही. यात सुशिक्षीत आणि आर्थिक संपन्नता असलेले काही खासगी डॉक्टरही मागे नाही. रुग्णसेवेच्या नावावर रुग्णांना वेठीस धरायचे आणि आपल्या इमारती जागोजागी उभ्या करायच्या एवढेच डॉक्टरांनी सध्या सुरु केले आहे. पूर्वी चंद्रपूर शहरात नगरपरिषद आणि आता महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार पार्किंगची व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र शहरातील काही डॉक्टरांकडे स्वत:चेही वाहन ठेवण्यासाठी जागा नसल्याचे वास्तव आहे.संभाव्य रुग्णांची गर्दी, बेडची संख्या, त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांसाठी जागा आदी सर्व बाजू तपासून पार्किंग व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. मात्र या सर्व बाबींना खासगी डॉक्टरांनी बगल दिली आहे. काही डॉक्टरांनी रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी नकाशा मंजूर केला आहे. मात्र मंजुर नकाशाप्रमाणे इमारतीचे बांधकामच करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, इमारतींचे बांधकाम सुरु असताना मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाट्टेल तसे बांधकाम करून डॉक्टर मंडळी मोकळे झाले आहेत. यासंदर्भात मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले.परवानगीनुसार बांधकाम नाहीचंद्रपूर शहरात जवळपास ५० च्यावर खासगी रुग्णालयांच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत. डॉक्टरांनी या इमारतीच्या बांधकामासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घेतली आहे. यासाठी त्यांनी इमारत बांधकामाचा नकाशाही मंजुर केला आहे. मात्र मंजुर नकाशानुसार बांधकाम न करता मनमर्जीनुसार बांधकाम केले आहे. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांत पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. मनपाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र ते डॉक्टरांना जाब विचारण्याच्या मनस्थितीत नसतात. अशावेळी रुग्णालयासमोर मिळेल त्या जागेवर वाहन पार्किग करतात. डॉक्टरांच्या या त्रासामुळे शेजाऱ्यांनी चक्क आपल्या घरांसमोर ‘नो पार्किंग’ असे फलक लावले आहे.